Monday, September 14, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंधित आरोपी निलेश चव्हाण जेरबंद

पुणे: प्रतिनिधी

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंधित गुन्ह्यात फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या विशेष पथकाने भारत नेपाळ सीमेनजीक जेरबंद केले आहे. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. तो तब्बल दहा दिवसांपासून फरार होता.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी संपूर्ण हगवणे कुटुंबावर गुन्हे दाखल करून त्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. याच प्रकरणात वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणे हिचा मित्र असलेल्या निलेश चव्हाण याला देखील सह आरोपी करण्यात आले आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या बाळाला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबीयांना निलेश याने बंदूक दाखवून धमकावल्याचेही सांगितले जात आहे.

कुटुंबाबाहेरचा असतानाही हगवणे कुटुंबातील प्रत्येक गोष्टीत आणि कृतीत निलेश चव्हाण याचा सहभाग होता. कौटुंबिक भांडणात आणि सुनांच्या छळातही तो सहभागी होता. सुनांचा छळ करणाऱ्या हगवणे कुटुंबीयांना त्याची साथ होती, असे आरोप हगवणे यांच्या घरातील सुनांनी केले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading