मर्सिडीज-बेंझ इंडिया आपल्या मॉडेल्सच्या एक्स-शोरूम किमती दोन टप्प्यात वाढविणार
जागतिक चलन बाजारात अस्थिरता असल्याने त्याचा परिणाम मर्सिडीज-बेंझ इंडिया आयात करत असलेल्या वाहनांच्या सुट्या भागावर होत आहे. यामुळे कंपनीने आपल्या विविध वाहनांच्या दरात १ जून २०२५ पासून रु. ९० हजार ते १२.२ लाख इतकी वाढ करायचे ठरविले आहे. तर त्यापुढील १.५% दरवाढ हि सप्टेंबर २०२५ मध्ये करण्यात येईल. ग्राहकांवरील आर्थिक परिणाम कमी करण्यासाठी कंपनी दोन-टप्प्यांमध्ये हा बदल लागू करेल, ज्यामुळे ग्राहकांना खरेदीचे नियोजन करण्याची लवचिकता मिळेल.
याविषयी अधिक महिती देताना संतोष अय्यर, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, मर्सिडीज-बेंझ इंडिया म्हणाले, “गेल्या चार महिन्यांत, बाजारात रुपयाचे अवमूल्यन झाले आहे, युरो ते भारतीय रुपयाच्या विनिमय दरात अंदाजे १०% घट झाली आहे. यामुळे आमच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात खर्चाचा दबाव निर्माण झाला आहे. युरो-भारतीय रुपयाच्या दरातील या तीव्र चढउताराचा गंभीर परिणाम आमच्या घटक आणि सीबीयू कारच्या आयातीच्या खर्चावर होत आहे. जरी आम्ही आजपर्यंत विनिमय दरातील बहुतांश फरक आत्मसात करत आलो आहोत आणि आमचे स्थानिकीकरण उपक्रम वाढवत आहोत, तरीही आता आम्हाला त्याचा एक छोटासा भार ग्राहकांवर टाकावा लागत आहे. परकीय चलनाच्या या हालचालीमुळे आमच्या ऑपरेशनल खर्चात सतत वाढ होत आहे. त्यामुळे आमच्या आणि आमच्या फ्रँचायझी भागीदारांच्या शाश्वत व्यवसायासाठी बाजारात ही थोडीशी किंमत सुधारणा करण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे.”
- मर्सिडीज-बेंझ जून आणि सप्टेंबर 2025 पासून ग्राहकांसाठी दोन टप्प्यांमध्ये स्थगित दर सुधारणा लागू करणार आहे.
- गेल्या चार महिन्यांत परकीय चलन विनिमय दर सुमारे 10% ने वाढले असून, त्यामुळे घटक आणि CBU उत्पादनांच्या किमतीत वाढ झाली आहे.
- मर्सिडीज-बेंझ इंडिया ही किंमतीतील तीव्र वाढ केवळ थोड्याच प्रमाणात ग्राहकांवर टाकत आहे, कारण कंपनी स्थानिकीकरण उपक्रम अधिक मजबूत करत आहे.
- मर्सिडीज-बेंझ फायनॅनशियल सर्विसेस (MBFS) ने अशा नाविन्यपूर्ण वित्तीय योजना आखल्या आहेत ज्या ग्राहकांवरील खर्चाचा परिणाम कमी करतील.
- दर सुधारणा C-Class साठी ₹90,000 पासून सुरू होऊन Mercedes-Maybach S 680 साठी ₹12.2 लाखांपर्यंत असतील.
- दुसऱ्या टप्प्यातील 1.5% दर सुधारणा 1 सप्टेंबर 2025 पासून लागू होईल.
- मर्सिडीज-बेंझ फायनॅनशियल सर्विसेसच्या नाविन्यपूर्ण योजनांमुळे दर सुधारणा असूनही ग्राहकांचे मासिक EMI जवळपास अपरिवर्तित राहतील.
Ex-showroom prices effective from 1 June 2025:
| Model | Current Ex-showroom price [in INR Lakhs] | New Ex-showroom price [in INR Lakhs] | Change [in INR Lakhs] |
||||
| C 200 | 59.4 | 60.3 | 0.9 | ||||
| GLC 300 4MATIC | 76.8 | 78.3 | 1.5 | ||||
| E 200 | 79.5 | 81.5 | 2.0 | ||||
| GLE 300d 4MATIC AMG Line | 99.0 | 101.5 | 2.5 | ||||
| EQS SUV 450 4MATIC | 128.0 | 131.0 | 3.0 | ||||
| GLS 450 4MATIC | 133.9 | 137.0 | 3.1 | ||||
| Maybach S 680 | 347.8 | 360.0 | 12.2 |
