एसबीआय जनरल इन्शुरन्सतर्फे फ्लेक्सी होम इन्शुरन्स – कस्टमायझेबल गृह विमा उत्पादन
मुंबई : एसबीआय जनरल इन्शुरन्स या भारतातील जनरल विमा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने एसबीआय जनरल फ्लेक्सी होम इन्शुरन्स लाँच केले आहे. ही सर्वसमावेशक आणि लवचिक विमा योजना असून त्याद्वारे भाडेशुल्कावरील मालमत्ता तसेच हाउसिंग सोसायटीजसारख्या विविध निवासी प्रकारच्या गरजा पुरवण्याचे ध्येय आहे.
‘एसबीआय जनरल फ्लेक्सी होम इन्शुरन्स’ योजना ग्राहकांना त्यांच्या गरजांप्रमाणे गृह विमा योजना डिझाइन करण्याची मुभा देते. या उत्पादनाचे अनोखे वैशिष्ट्ये म्हणजे, ते ग्राहकांना स्वतंत्र ‘अग्नी’ विमा कवच अनिवार्य म्हणून देते, जे प्रत्येक घरमालकासाठी वैयक्तिक संरक्षणाची हमी देते. या अतिरिक्त सुविधांमध्ये मौल्यवान वस्तूंसाठी संरक्षण, राहाण्याच्या पर्यायी जागेचा खर्च, चोरीसाठी सुरक्षा कवच तसेच विविध पर्यायी कवचांवर सवलतींचा समावेश आहे.
हे उत्पादन घराचे बांधकाम, त्यातील वस्तू आणि अतिरिक्त जोखमींवर सर्वसमावेशक संरक्षण देते. ही योजना मालमत्तेचे नुकसान, नैसर्गिक संकटे, आग आणि चोरी अशा संकटांमुळे हानी होण्यापासून सुरक्षितता देते. त्यामध्ये अनपेक्षित घटनांचाही समावेश असल्यामुळे सुरक्षितता हवी असलेले घरमालक व भाडेकरूंना विश्वासार्ह पर्याय मिळतो. त्याशिवाय यामध्ये २० वर्षांपर्यंत वन- टाइम पेमेंट करून दीर्घकालीन सुरक्षाही दिली जाते.
योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये
– अग्नी कवच: एकमेव अनिवार्य कवच
– घराचे बांधकाम, त्यातील वस्तू आणि अतिरिक्त जोखमींसाठी सर्वसमावेशक संरक्षण
– पर्यायी संकटे/कवच – नैसर्गिक संकटे, चोरी आणि दरोड्यापासून संरक्षण
– दीर्घकालीन सुरक्षा – २० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी वन-टाइम पेमेंट
– आकर्षक पर्यायी कव्हर्स आणि सवलतींचे पर्याय उपलब्ध
लाँचविषयी सुब्रमण्यम ब्रह्माजोस्युला, प्रमुख, उत्पादन आणि मार्केटिंग अधिकारी, एसबीआय जनरल इन्शुरन्स म्हणाले, ‘प्रत्येक घर वेगळं असतं आणि म्हणून त्याच्या संरक्षणाच्या गरजाही वेगळ्या असतात याची एसबीआय जनरल इन्शुरन्सला जाणीव आहे. घरमालकाला आपल्या आयुष्याभराची गुंतवणूक असलेलं घर सुरक्षित ठेवायचं असो किंवा भाडेकरूला मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवायच्या असो, प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगवेगळ्या असतात. ‘एसबीआय जनरल फ्लेक्सी होम इन्शुरन्स’ या योजनेद्वारे आम्ही गरजेनुसार सुविधा देतो आणि ग्राहकाला लवचिक व विस्तारित कव्हरेजसह मनःशांती मिळते. हे उत्पादन ग्राहकांना त्यांच्या संरक्षणाच्या गरजा निवडण्याची आणि अनपेक्षित परिस्थितीमध्ये आर्थिक सुरक्षा जपण्याची मुभा देत सक्षम करते.’
एसबीआय जनरल फ्लेक्सी होम इन्शुरन्स वैविध्यपूर्ण आणि ग्राहक केंद्रित गृह विमा योजना असून ते वैविध्यपूर्ण घरमालक भाडेकरूंच्या गरजा पूर्ण करते. वन- टाइम प्रीमियम पेमेंटचा पर्याय आणि सफाईदार क्लेम प्रक्रिया यांच्या मदतीने विमा योजना विकसित करण्यात आली असून ती नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक विमा सुविधा देते.
