Thursday, June 18, 2026
BusinessLatest News

‘बजाज अलियान्झ लाइफ’कडून पार्टिसिपेटिंग पॉलिसीधारकांसाठी १,८३३ कोटी रुपयांचा आजपर्यंतचा सर्वाधिक बोनस जाहीर

पुणे : भारतातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स’ने २०२४–२५ या आर्थिक वर्षासाठी (एफवाय२५) आजपर्यंतचा सर्वाधिक, १,८३३ कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. मागील वर्षी जाहीर केलेल्या १,३८३ कोटींच्या तुलनेत यावर्षी बोनसमध्ये ३२ टक्क्यांची वाढ आहे. कंपनीच्या पार्टिसिपेटिंग (विविध लाभ देणाऱ्या) योजनांमध्ये गुंतवणूक केलेल्या ११.७१ लाखांहून अधिक पॉलिसीधारकांना या बोनसचा लाभ होणार आहे. अशा प्रकारे सलग २४ वर्षे बोनस जाहीर करून ग्राहकांना मूल्यनिर्मिती देण्याचा वारसा कंपनीने कायम राखला आहे.

दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत अंमलात असलेल्या पारंपरिक पार्टिसिपेटिंग पॉलिसीधारकांना हा बोनस मिळणार असून, तो पार्टिसिपेटिंग निधीतून निर्माण झालेल्या अधिशेषातून दिला जाईल. कंपनीकडे ‘बजाज अलियान्झ लाइफ एस’ (नॉन लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक आयुर्विमा बचत योजना), ‘बजाज अलियान्झ लाइफ एस अ‍ॅडव्हांटेज’ (नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, आयुर्विमा बचत योजना) आणि ‘बजाज अलियान्झ लाइफ एलिट अॅश्युअर’ (नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक आयुर्विमा बचत योजना) अशा विविध पार्टिसिपेटिंग स्वरुपाच्या योजना आहेत. त्या ग्राहकांना त्यांच्या जीवनाच्या विविध उद्दिष्टांसाठी लवचिकता प्रदान करतात. या योजनांचे पॉलिसीधारक या बोनसचा लाभ घेऊ शकतात.

याशिवाय, ‘बजाज अलियान्झ लाइफ एस – वेल्थ ऑप्शन’ आणि ‘बजाज अलियान्झ लाइफ फ्लेक्सी इन्कम गोल –एन्हान्स्ड बेनिफिट’ (नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, हमी उत्पन्न देणारी योजना) या इक्विटी-वाटप जास्त असलेल्या योजनांतील पॉलिसीधारकांसाठी ५ टक्के विशेष रिव्हर्शनरी बोनसची घोषणा करण्यात आली असून त्याची एकूण रक्कम २०६ कोटी आहे.

बोनसच्या या घोषणेबाबत बोलताना ‘बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण चुग म्हणाले, “आम्ही यंदा १,८३३ कोटींचा आजवरचा सर्वाधिक वार्षिक पार्टिसिपेटिंग (पीएआर) बोनस जाहीर करताना आनंदित आहोत. ही आमच्या चाणाक्षपणाने रचलेल्या गुंतवणूक धोरणांची आणि मजबूत आर्थिक पाया असण्याची साक्ष आहे. ग्राहक केंद्रित विमा कंपनी म्हणून आम्ही नेहमीच कार्यक्षमतेवर आधारित अशा उपाययोजना पुरवतो ज्या लोकांना आत्मविश्वासाने त्यांच्या जीवनाच्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यात मदत करतात.”

दरवर्षी जाहीर होणारे बोनस संबंधित पॉलिसीच्या परिपक्वतेवेळी किंवा पॉलिसीमधून बाहेर पडताना वितरित केले जातात. याव्यतिरिक्त, रोख बोनस पॉलिसीच्या वर्धापन दिनी किंवा पॉलिसीच्या अटींनुसार दिले जातील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading