Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडतर्फे आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर

डीआरएचपी लिंक:

https://nsearchives.nseindia.com/corporate/Registration_29042025025607_DRHP_CHL.pdf

भारतातील जीवन विमा क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक-प्रणीत खाजगी कंपनी कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडतर्फे प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) सेबीकडे दाखल करण्यात आला आहे.

कॅनरा बँक आणि एचएसबीसी इनश्युरन्स (आशिया पॅसिफिक) होल्डीग्ज लिमिटेड हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत.

या आयपीओ मध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या एकूण 237,500,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा प्रस्ताव आहे (“Offer for Sale”) यामध्ये कॅनरा बँक (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) कडून 137,750,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स; एचएसबीसी इनश्युरन्स (आशिया पॅसिफिक) होल्डीग्ज लिमिटेड (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) यांच्या कडून 4,750,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि पंजाब नॅशनल बँक (“गुंतवणूकदार विक्री समभागधारक”) कडून 95,000,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत.

कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही भारतातील एक खाजगी जीवन विमा कंपनी आहे आणि ती कॅनरा बँक (31 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत एकूण मालमत्तेच्या आधारावर भारतातील चौथी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे – स्रोत: CRISIL अहवाल) आणि एचएसबीसी इनश्युरन्स (आशिया पॅसिफिक) होल्डीग्ज लिमिटेड (ही द हॉंगकॉंग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (“HSBC”) समूहाचा एक भाग आहे) यांच्यामार्फत प्रवर्तित आहे. एचएसबीसीची जागतिक वित्तीय संस्था म्हणून असलेली प्रतिष्ठा कंपनीसाठी विश्वासार्हता आणि ब्रँड मूल्य वाढवते. 31 मार्च 2024 पर्यंत, कंपनी सार्वजनिक क्षेत्रातील प्रवर्तक असलेल्या जीवन विमा कंपन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता (AUM) होती (स्रोत: CRISIL अहवाल) आणि आर्थिक वर्ष 2024 मध्ये जीवन संरक्षण प्रमाण या आधारे भारतातील अग्रणी पाच बँक-प्रेरित जीवन विमा कंपन्यांमध्ये तिचा समावेश आहे (स्रोत: CRISIL अहवाल).

2007 मध्ये स्थापन झालेली कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही कंपनी भारतीय जीवन विमा क्षेत्रातील अग्रणी बँक प्रणीत खाजगी कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये जीवन विमा संरक्षण घेतलेल्या संख्येच्या आधारे सार्वजनिक क्षेत्रातील बँक-प्रेरित जीवन विमा कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे (स्रोत: CRISIL अहवाल). कंपनीचा अ‍ॅन्युअलाइज्ड प्रीमियम इक्विव्हलेन्ट (APE) सातत्याने वाढत आहे. त्यातून उत्पादन व सेवा विस्ताराच्या प्रयत्नांचे आणि बाजारातील स्थान वाढवण्याच्या धोरणाचे प्रतिबिंब दिसते. कंपनीचा करपश्चात नफा आर्थिक वर्ष 2022 मधील 102.43 दशलक्ष रु. वरून आर्थिक वर्ष 2024 मध्ये 1,133.17 दशलक्ष रु. पर्यंत 232.61% CAGR ने वाढला असून 31 डिसेंबर 2024 रोजी समाप्त झालेल्या नऊ महिन्यांत तो 848.93 दशलक्ष रु. होता.

कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE” आणि बीएसई सह एकत्रितपणे “स्टॉक एक्सेंज”) या शेअर बाजारांवर लिस्टिंगसाठी प्रस्तावित आहेत.

एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, बीएनपी परिबास, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर्स लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading