Sunday, April 5, 2026
Latest NewsPUNE

नाटय, भक्ती आणि सुगम संगीताने सजला ‘स्वरयज्ञ’पं. शौनक अभिषेकी

पुणे : बंदिश व उपशास्त्रीय गायनासह नाटयसंगीत, भक्तिसंगीत आणि सुगम संगीत असे तिन्ही प्रकार पुणेकरांनी एकाच रंगमंचावर अनुभवले. पं. शौनक अभिषेकी, पं. रघुनंदन पणशीकर, मंजुषा पाटील व सहका-यांनी नाट्यसंगीत, लोकसंगीत, भावसंगीताचा प्रवास रसिकांसमोर उलगडत भारतीय संगीत परंपरेची अनुभूती स्वरयज्ञाद्वारे उपस्थितांना दिली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेच्या प्रांगणात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या दुस-या दिवशी पं. शौनक अभिषेकी, पं. रघुनंदन पणशीकर, मंजुषा पाटील व सहका-यांची सुरेल मैफल आयोजित करण्यात आली होती.

हंसध्वनी रागातील गणेश स्तुतीने पं. रघुनंदन पणशीकर यांनी स्वरयज्ञाचा प्रारंभ केला. त्यानंतर सादर झालेल्या जानकी नाथ सहाय करे.. या पणशीकर यांच्या रसमय गायनशैली द्वारे सादर झालेल्या भजनाने रसिकांनी मंत्रमुग्ध केले. मंजुषा पाटील यांनी देखील बंदिश आणि उपशास्त्रीय गायन सादर केले. पं शौनक अभिषेकी यांनी आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. गुरुजी में तो एक निरंजन या अभिषेकी यांनीसादर केलेल्या रचनेला रसिकांनी भरभरून दाद दिली.

बाजे रे मुरलीया… यांसह एकाहून एक सरस रचना यावेळी या तिन्ही दिग्गजांनी सादर केल्या. त्यांना अभेद अभिषेकी, देवर्षी दंडवते, राज शहा यांसह प्रशांत पांडव (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), अपूर्व द्रविड (साईड रिदम), दिलीप तिकोणकर (पखावज) यांनी साथसंगत केली. रवींद्र खरे यांनी निवेदन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading