Sunday, May 31, 2026
Latest NewsLIFESTYLEPUNE

‘चाळीशीनंतरचे महिलांचे कामजीवन व हार्मोनल बदल’ या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन

 

पुणे : पुण्यातील पी.एम शहा फाऊंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधत ‘चाळीशीनंतरचे महिलांचे कामजीवन व हार्मोनल बदल’ या विषयावर सेक्स आणि रिलेशनशिप तज्ज्ञ असलेल्या डॉ. सबिहा इनामदार यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. येत्या शनिवार दि. १५ मार्च रोजी लॉ कॉलेज रस्त्यावरील एनएफडीसी – राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे दुपारी ३:३० वाजता सदर व्याख्यान संपन्न होणार असल्याची माहिती पी. एम. शहा फाउंडेशनचे संचालक ॲड. चेतन गांधी यांनी कळविली आहे. हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी असून त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विनामूल्य प्रवेश देण्यात येईल.

चाळीशीनंतर महिलांचे कामजीवन केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक व भावनिक समाधानावर देखील अवलंबून असते. या टप्प्यावर लैंगिक आयुष्य अधिक समृद्ध होऊ शकते. जर ते समजून घेतले आणि जोडीदारासोबत सुसंवाद ठेवला गेला तर शरीर आणि मनाच्या गरजा समजून घेतल्यास, या वयातही परिपूर्ण आनंद मिळू शकतो. योग्य माहिती व संवादाच्या मदतीने आरोग्याचे अनेक प्रश्न व शंका या व्याख्यानातून माध्यमातून महिलांना जाणून घेता येऊ शकणार आहे. या विषयावर संवाद साधताना डॉ. सबिहा उपस्थित महिलांना या वयात होणाऱ्या बदलांची, आव्हानांची आणि संधीची माहिती देतील तसेच त्यांच्या मनातील शंकांचे निरसन देखील करतील. डॉ सबिहा इनामदार यांचा २० वर्षाहून अधिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनुभव असून लैगिकता व नातेसंबध कोचिंग यामध्ये त्यांचा १० वर्षांचा अनुभव आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading