पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रुनरशिपमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा
पुणे: पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रुनरशिपमध्ये ८ ते ११ मार्च २०२५ दरम्यान आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 7 मार्च रोजी, लष्कर पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला, त्यानंतर ८ मार्च रोजी इन्स्टिट्यूट मध्ये रेखा जैन यांचा सन्मान करण्यात आला. व ११ मार्च रोजी इन्स्टिट्यूट मध्ये विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या संचालिका डॉ. पोरिनिता बॅनर्जी यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्काराने झाली.
प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट आणि शिक्षिका सौ. जयश्री वेंकटेश यांनी महिलांच्या आर्थिक साक्षरतेचे महत्त्व स्पष्ट केले. सामाजिक कार्यकर्त्या सौ. पूर्णिमा गाडिया यांनी महिलांसाठी स्वयंसहाय्यता गट आणि निवारा केंद्र स्थापनेच्या कार्यावर प्रकाश टाकला. रिलेशनशिप कौन्सेलर सौ. मोना मोरे यांनी मानसिक आरोग्य व आत्मविश्वासाविषयी मार्गदर्शन केले. झुंबा प्रशिक्षक सौ. पूनम जैन यांनी शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्य याबद्दल प्रेरणादायी विचार मांडले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. मोहम्मद तळहा अहमद आणि श्री. झाफर अहमद खान यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचा समारोप महिला प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनींच्या सत्काराने झाला.
