Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

PIMSE विद्यार्थ्यांचा कात्रज डेअरीला शैक्षणिक भेट दौरा!

पुणे : पुणे मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्युअरशिप (PIMSE) संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कात्रज डेअरीला शैक्षणिक भेट दिली. या दौर्‍याचा उद्देश विद्यार्थ्यांना डेअरी उद्योग, त्याच्या कार्यप्रणाली आणि विविध दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादन प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती मिळवून देणे हा होता. या दौर्‍यामध्ये एकूण 50 विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी सहभागी झाले.

विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेल्या डेअरी उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वयंचलित प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. या भेटीमुळे त्यांचे व्यावहारिक ज्ञान समृद्ध झाले.

कात्रज डेअरीच्या संपूर्ण टीमचे आणि सौ. अर्चना नरुटे यांचे विशेष आभार, ज्यांच्या सहकार्यामुळे हा दौरा यशस्वी ठरला!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading