पीआयएमएसईत ‘फेस्टिना २०२५’च्या माध्यमातून उद्योजकतेचा जागर!
पुणे : PIMSE मध्ये फेस्टिना २०२५ हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तक्वा ज्वेलर्स, पुणे यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात ३० आकर्षक स्टॉल्स लावण्यात आले होते, जिथे विद्यार्थ्यांसह बाह्य विक्रेत्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन केले.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्टार्टअप संकल्पना, व्यवसाय प्रक्रिया आणि उत्पादन विकास यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि उद्योजिका मीनाझ असलम यांचे प्रेरणादायी भाषण. त्यांनी आपल्या करिअरमधील संघर्ष व यशाची कहाणी सांगत, जिद्द आणि नवोपक्रम महत्त्वाचे असल्याचा संदेश दिला.
हा कार्यक्रम डॉ. अंजुम सय्यद आणि श्री. तल्हा अहमद यांनी डॉ. पोरीनिता बॅनर्जी संचालक, यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे आयोजित केला.
