Thursday, October 29, 2026
Latest NewsPUNE

पीआयएमएसईत ‘स्कूल कनेक्ट २.०’ यशस्वीपणे संपन्न!

पुणे : PIMSE मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्कूल कनेक्ट २.० उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या अंतर्गत AKI पूना कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स येथील ११वी व १२वीच्या विद्यार्थ्यांनी PIMSE कॅम्पसला भेट दिली.
विद्यार्थ्यांनी स्मार्ट क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा आणि ग्रंथालय यांसारख्या आधुनिक सुविधा अनुभवल्या, ज्यामुळे त्यांना उच्च शिक्षणाच्या नव्या दृष्टीकोनाची ओळख झाली.
डॉ. शीना अब्राहम आणि डॉ. अंजुम सय्यद यांनी नवी शैक्षणिक धोरण (NEP) या विषयावर माहितीपर सत्र घेतले. त्यांनी या धोरणाच्या आंतरशाखीय आणि लवचिक रचनेमुळे विद्यार्थ्यांना करिअरसंदर्भात सुयोग्य निर्णय घेण्यास मदत कशी होते हे स्पष्ट केले.
संचालक डॉ. पोरीनिता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. स्कूल कनेक्ट २.० विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले!

Leave a Reply