Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

गुरु विदुषी मीरा पणशीकर यांना  ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार’ प्रदान

पुणे : माझ्या परात्पर गुरू गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे, हे जीवनाचे सार्थक आहे, असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ गायिका, गुरू विदुषी मीरा पणशीकर यांनी रविवारी येथे काढले.

नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार या वर्षी जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गुरु विदुषी मीरा पणशीकर यांना रविवारी सायंकाळी कर्वेनगर येथील राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स या ठिकाणी संपन्न झालेल्या ११ व्या गानसरस्वती महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रदान करण्यात आला. नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त व सुप्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, बिभास आमोणकर व‌ तेजश्री आमोणकर यावेळी उपस्थित होते. पुरस्काराचे हे नववे वर्ष आहे.
विदुषी मीराताई म्हणाल्या,” हा पुरस्कार माझ्यासाठी बहुमोल आहे. मी भाग्यवान आहे कारण मोगुबाईं उर्फ माईंचा सहवास मला लाभला. त्यांची शिस्त, करारीपणा, ऋजुता, तळमळ, जिज्ञासा, ध्यास…मी अनुभवला आहे. मी त्यांचा ओरडा खाल्ला आहे आणि कौतुकही स्वीकारले आहे. माझ्या सर्व गुरुजनांच्या आठवणींना मी हा पुरस्कार समर्पित करते. माझ्या कुटुंबियांचा आणि शिष्यांचाही मोठा वाटा यामध्ये आहे,”.

कलाकारांच्या सातत्यपूर्ण संगीत सेवेकरिता प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार दिला जातो.  ५१ हजार रुपये व मानपत्र असे गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्काराचे स्वरूप आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading