Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

पहिली राष्ट्रीय जाधवर मूट कोर्ट स्पर्धा पुण्यात


जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्, न-हेच्या जाधवर विधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजन

पुणे : जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या जाधवर विधी महाविद्यालय आणि अ‍ॅड. शार्दुलराव सुधाकरराव जाधवर विधी महाविद्यालयाच्या वतीने पहिल्या राष्ट्रीय जाधवर मूट कोर्ट स्पर्धेचे आयोजन पुण्यात संस्थेच्या सभागृहात करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी सुरू झाली असून दिनांक २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी इन्स्टिट्यूटच्या न-हे शैक्षणिक संकुलात ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी दिली.

विजेत्याला रुपये ३५ हजार आणि चषक, उपविजेत्याला रुपये २० हजार आणि चषक, बेस्ट मेमोरियल पुरस्कार रुपये १५ हजार आणि चषक, बेस्ट स्पीकर रुपये १० हजार आणि चषक, बेस्ट रिसर्चर रुपये ५ हजार आणि चषक, बेस्ट स्पीकर(प्रिलिम्स) रुपये ५ हजार आणि चषक प्रदान केला जाणार आहे. मेमोरियल सबमिशनसाठी अंतिम दिनांक १२ फेब्रुवारी असून अधिक माहितीसाठी ९२८४२४६६६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading