Saturday, June 13, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

IPRS ने ‘माय म्युझिक, माय राइट्स’च्या दुसऱ्या सत्राची पुण्यात दमदार सुरुवात केली

 

पुणे : इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी (IPRS) च्या ‘माय म्युझिक, माय राइट्स: क्रिएटर्स कनेक्ट प्रोग्रॅम’च्या दुसऱ्या सत्राचा पहिला कार्यक्रम काल यशस्वीपणे पार पडला. पुण्यातील अजेन्क्या डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी येथे झालेल्या या कार्यक्रमाला संगीत क्षेत्रातील निर्माते, स्वतंत्र कलाकार आणि उद्योगातील व्यावसायिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या मंचाच्या माध्यमातून सहभागी संगीत निर्मात्यांना बौद्धिक संपदा हक्क (IP Rights), संगीत निर्मात्यांचे मानधन (Royalties), म्युझिक पब्लिशिंग, संगीत निर्मिती सुधारण्यासाठी उपयुक्त तंत्रे आणि यूट्यूबच्या माध्यमातून संधी कशा साधता येतील याची माहिती मिळाली. याशिवाय, नवोदित कलाकारांनी संगीत इंडस्ट्रीत आपली वाटचाल कशी करावी आणि संगीत क्षेत्रात विविधता वाढविण्यासाठी कोणते पाऊल उचलता येतील यासंदर्भात महत्त्वपूर्ण पॅनल चर्चा देखील पार पडल्या.
या सत्रांमध्ये अनेक अनुभवी तज्ज्ञांनी संगीत निर्मात्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले. तसेच, उद्योगातील तज्ज्ञांनी संगीत निर्मितीच्या बाजारपेठेतील संधींबाबत महत्त्वपूर्ण उपाय आणि धोरणे मांडली. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांमध्ये करण ग्रोवर (सिनियर डायरेक्टर, इंडिया, मिडल ईस्ट आणि आफ्रिका – डॉल्बी लॅब्स), सागरिका दास (CEO, सागरिका म्युझिक), भास्कर नायर (पार्टनर इंजिनियर, यूट्यूब म्युझिक), निखिल नेरकर (स्ट्रॅटेजिक पार्टनर मॅनेजर, यूट्यूब म्युझिक), चंद्रिका शाह (इंडिया हेड, होरस म्युझिक), सई तेंभेकर (गायिका व गीतकार), आणि मुर्तुजा गडीवाला (संस्थापक, आउटराइट पब्लिशिंग) यांचा समावेश होता.
याशिवाय, IPRS च्या मार्केटिंग, कम्युनिकेशन आणि मेंबर रिलेशन्स हेड रुम्पा बॅनर्जी यांनी संगीत निर्मात्यांसाठी रॉयल्टी व्यवस्थापन आणि संगीत कॉपीराइट संस्थांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या यशावर भाष्य करताना IPRS चे CEO श्री. राकेश निगम म्हणाले, “आज संगीत निर्मात्यांनी दाखवलेली उत्सुकता आणि जिज्ञासा पाहून अतिशय आनंद होत आहे. IPRSच्या माध्यमातून आम्ही संगीत निर्मात्यांना त्यांचे हक्क आणि त्यांच्यासाठी उपलब्ध संसाधनांबद्दल जागरूक करत आहोत. विविध प्रकारचे कलाकार एकत्र येऊन शिकत आहेत, अनुभव शेअर करत आहेत आणि पुढे जात आहेत, हीच या उपक्रमाची खरी प्रेरणा आहे. आमचा उद्देश म्हणजे संगीत निर्मात्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन त्यांचे योगदान योग्य प्रकारे ओळखले जावे आणि त्यांना न्याय मिळावा.”

या कार्यक्रमाने संगीत निर्मात्यांना उद्योगातील नवीन ट्रेंड आणि व्यावसायिक दृष्टीकोन शिकण्याची संधी दिली, तसेच कलाकारांना आपले विचार मांडण्यासाठी आणि व्यावसायिक नेटवर्क वाढविण्यासाठी उपयुक्त मंच प्रदान केला.

या उपक्रमाचा पुढील विस्तार अहमदाबाद (६ फेब्रुवारी), बेंगळुरू (२० फेब्रुवारी), चेन्नई (६ मार्च), लखनऊ (२६ मार्च) आणि पाटणा (९ एप्रिल) येथे होणार आहे.

इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी (IPRS) संगीत निर्मात्यांच्या सक्षमीकरणासाठी सतत प्रयत्नशील असून, त्यांचे हक्क सुरक्षित राहावेत, त्यांच्या कलाकृतींना न्याय मिळावा आणि संगीत क्षेत्र अधिक न्यायसंगत व समृद्ध व्हावा यासाठी कटिबद्ध आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading