Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

उच्च शिक्षण आणि जबाबदार समाज घटक म्हणून प्रत्येकाची भागीदारी – डॉ. सुरेश गोसावी

 

पुणे :  भारतीय शिक्षण आणि शिक्षणव्यवस्थेचे आंतरराष्ट्रीयीकरण वेगाने होऊन आपण अधिमान्य जागतिक शिक्षणव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहोत पण त्यासाठी उच्च शिक्षण आणि जबाबदार समाज घटक म्हणून समाजाच्या प्रत्येक घटकाने आपली भागीदारी निश्चित करायला हवी, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित करत होते. याप्रसंगी विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोरील प्रांगणात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा.(डॉ.) पराग काळकार, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ.) ज्योती भाकरे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्या परिषद सदस्य, अधिसभा सदस्य उपस्थित होते.

उच्च शिक्षण ही एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून उदयात येत आहे. त्यातून केवळ व्यक्तीचा नाही तर संपूर्ण राष्ट्राच्या सर्वांगीण समृद्धीवर परीणाम होत असतो. त्यादृष्टीकोनातून भारतीय उच्च शिक्षणाकडे पाहिले गेले पाहिजे. तसेच वातावरणातील बदल, पर्यावरणाचा ऱ्हास आणि संसाधनाची कमतरता यासह जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये तरुणांमध्ये सक्षम करण्यात देखील उच्च शिक्षणाची मध्यवर्ती भूमिका आहे. ज्ञान व व्यावहारिक कौशल्ये उच्च शिक्षणातून तर मिळालेच पाहिजे परंतु त्यातून मूल्ये आणि गंभीर विचार करण्याची क्षमता प्रदान करता आली पाहिजे, समाजात अर्थपूर्ण मार्गाने आपले स्थान शोधायला मदत करता आली पाहिजे. शिक्षणामध्ये हे परिवर्तन अधिक महत्वाचे असल्याचे ते यावेळी बोलले.भारताच्या शतक महोत्सवानंतर पाठोपाठ विद्यापीठ आपला शतक महोत्सव साजरा करणार आहे. त्यामुळे प्रशासन, शैक्षणिक विभाग, संलग्नित महाविद्यालये /परिसंस्था आणि समाजातील घटकांना जोडून पुढील २५ वर्षाचा क्वांटम झेपेसाठी एक स्वतंत्र विभाग करून विकसित विद्यापीठासाठी एक धोरण ठरवावे आणि त्याची कालबद्ध अंमलबजावणी व्हावी तसेच भविष्यातील विद्यापीठ या अंतर्गत पंचसूत्री कार्यक्रम आखून समाजाच्या सर्व घटकांकडून सूचना, नव्या संकल्पना मागवून घेऊन लोकाभिमुख विद्यापीठ म्हणून नावलौकिक प्राप्त करण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला.

भारत सरकारने नुकताच मराठी, प्राकृत आणि पाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला आहे. या तिन्ही भाषांचे विभाग विद्यापीठात असून त्या विभागांच्या ध्येयधोरणात विशेष विकासाला प्राधान्य देण्यात येईल. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेला महत्व प्राप्त झाले असून विद्यापीठाने या उद्दिष्ठानुसार कार्यवाही सुरु केली आहे. शिक्षण मंत्रालय, युजीसी आणि भारतीय भाषा समितीने विद्यापीठाची मराठी भाषेसाठी नोडल विद्यापीठ म्हणून नेमणूक केली आहे. याद्वारे पाच वर्षात १००० पाठ्यपुस्तके निर्माण करण्यात येत आहे. सध्या ५० पाठयपुस्तके निर्मितीचा टप्पा प्रगतीपथावर आहे तसेच यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमातही नवी पाठयपुस्तके तयार करण्याची प्रक्रिया कार्यन्वित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विकसित भारत २०४७ हा संकल्प घेऊन सर्व भारतीय एकसंधपणे वाटचाल करीत असून या कार्यात आपण विद्यापीठ म्हणून सहभागी व्हायला हवे. कारण जगातील महत्वाच्या विद्यापीठाचे तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शैक्षणिक संस्थेचे आपण नेतृत्व करतो आहोत. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या माध्यमातून देशाचा विकास याच विशिष्ट उद्दिष्ठाने विद्यापीठ परिक्षेत्रातील प्रत्येक तरुणाला पुढे न्यायाचे आहे, असेही कुलगुरूंनी यावेळी सांगितले.

भारतात उच्च शिक्षणातून अर्थार्जनाचे कौशल्य असलेली हुशार, पण आत्मकेंद्रित, संवेदनाहीन, चंगळवादी, करिअरिस्ट अशी पिढी सध्या घडत असून आज शिक्षणातून शील व करुणा हे घटक गायब झाल्याची खंत व्यक्त करत या पार्शवभूमीवर गौतम बुद्धांचा प्रज्ञा, शील व करुणा या विचाराकडे विद्यार्थ्यांनी गांभीर्याने पाहण्याचे आवाहनही डॉ. गोसावी यांनी यावेळी केले. या संबोधनात विद्यापीठात राबविण्यात येत असलेले आणि भविष्यात राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांबद्दल त्यांनी माहिती दिली. तसेच विद्यापीठाच्या स्थापना दिनी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा डॉ. गोसावी यांनी यावेळी केली.

एनसीसीच्या संचलनपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमानंतर लहान मुलांना कुलगुरूंच्या हस्ते खाऊचे वाटप देखील करण्यात आले. याप्रसंगी विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

उत्कृष्ट महाविद्यालय / परिसंस्था पुरस्कार
१. व्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग) – ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे, इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट, केनेडी रोड पुणे.
२. व्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग) – मातोश्री शिक्षण संस्थेचे मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र, ओढागावजवळ, नाशिक.
३. अव्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग) – वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शरणपूर रोड नाशिक
४. अव्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग) – १) मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वर नगर, बारामती, जिल्हा पुणे विभागून २) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर आबासाहेब उर्फ एन. एम. सोनावणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सटाणा ता. बागलाण जि. नाशिक
५. उत्कृष्ट विद्यापीठ विभाग पुरस्कार (विज्ञान / तंत्रज्ञान विद्याशाखा ) – मिडीया आणि कम्युनिकेशन स्टडीज विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

उत्कृष्ट प्राचार्य / संचालक पुरस्कार
१. व्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग) – डॉ. मारू अविश द्वारकादास, श्री गुरूदत्त शिक्षण संस्थेचे लोकनेते डॉ. जे. डी. पवार कॉलेज ऑफ फार्मसी, ता. कळवण, जि. नाशिक
२. अव्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग) – डॉ. शिंदे भरत पंढरीनाथ,विद्याप्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, विद्यानगरी, ता. बारामती जि. पुणे

उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार
१. व्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग)- डॉ. देशकर संजीवनी शेखर, डॉ. डी. वाय पाटील इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे
२. व्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग) – डॉ.मुंदडा अतिशकुमार श्रीकिसन, श्री. नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम (गुरुकुल) संस्थेचे श्रीमान सुरेशदादा जैन कॉलेज ऑफ फार्मसी, ता. चांदवड, जि. नाशिक
३. अव्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग) – डॉ. पाटील सुप्रिया संतोष,महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, पुणे
४. अव्यावसायिक अभ्यासक्रम विभाग (ग्रामीण विभाग)- डॉ. कुदनर चांगदेव किसन, श्री. नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम (गुरूकुल) संस्थेचे केशवलालजी हरकचंदजी आबाद कला आणि श्रीमान एम. जी. लोढा कॉमर्स व श्री. पी. एच. जैन सायन्स कॉलेज, ता. चांदवड, जि.नाशिक

उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी पुरस्कार
१. व्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग)- डॉ. सुतार नितीन गुलाब, संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटीचे संजीवनी फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर
२. अव्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग)- डॉ. भगत राणी बबनराव, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी, जि. पुणे
३. विद्यापीठ विभाग (विज्ञान व तंत्रज्ञान शाखा)- डॉ. मोकाट दिगंबर नाभू, वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड रोड, पुणे
४.विद्यापीठ विभाग (विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या व्यतिरिक्त) – डॉ. आहुजा रवी शंकरलाल, कौशल्य विकास केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठ, गणेशखिंड रोड, पुणे

उत्कृष्ट नाविन्यपूर्ण विशेष उपक्रम / संशोधन पुरस्कार
१. डॉ. मैत्रे नीता प्रविण
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन, कर्वेनगर, पुणे
विभागून
१. डॉ. परदेशी शीतल पोपटप्रसाद
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे, मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,
शिवाजीनगर, पुणे

उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार (शहरी विभाग)
१. शहरी विभाग – डॉ. श्रीमती दंडवते वृषाली साईनाथ,ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे, ए. आय. एस. एस.एम.एस. अभियांत्रिकी महाविद्यालय, केनेडी रोड, पुणे.

उत्कृष्ट संचालक, शारीरिक शिक्षण व क्रिडा पुरस्कार
१. शहरी विभाग – श्रीमती कोंढारे मनिषा मनोज, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे, ए. आय.एस. एस.एम.एस. अभियांत्रिकी महाविद्यालय, कोडी रोड, पुणे
२. ग्रामीण विभाग – श्री. इंगळे सुरेश देवराव, मराठा विद्याप्रसारक समाजाचे, जी. एम. डी. आर्टस, बी. डब्ल्यू. वाणिज्य आणि सायन्स कॉलेज, ता. सिन्नर, जि. नाशिक

युवा गौरव पुरस्कार (२०२४ – २५)
१. कला (चित्रपट व नाट्य अभिनय) – श्री. शुभंकर वासुदेव एकबोटे
२. क्रीडा – श्री. स्वप्नील सुरेश कुसाळे, (नेमबाजी) ऑलिंम्पिक २०२४ स्पर्धेत कांस्यपदक विजेता3. साहित्य (लेखन – कादंबरीकार व पटकथाकार) – श्री. सुमेधकुमार इंगळे
४. सामाजिक कार्य – श्री. संदिप मच्छिंद्र कुसळकर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading