डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे १०१ कॉर्नियल (नेत्र) प्रत्यारोपण यशस्वीरित्या पूर्ण
पिंपरी : डॉ.डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्चसेंटर पिंपरी, पुणे , आम्ही १०१ कॉर्नियल (नेत्र) प्रत्यारोपण यशस्वीरित्या पूर्णकेल्याबद्दल आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे.या नेत्र प्रत्यारोपणामुळे १०१ लोकांना पुन्हा दृष्टी मिळाली आणित्यांचे आयुष्य प्रकाशमान झाले. दृष्टी गमावलेल्या लोकांना पुन्हा दृष्टी मिळवून देणे आणित्यांना त्यांचे आयुष्य नव्याने जगण्याची संधी देणे हा संस्थेच्या ध्येयातील हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. कॉर्नियल प्रत्यारोपण ही आयुष्य बदलवून
टाकणारी प्रक्रिया आहे. कॉर्नियलचे चट्टे, संक्रमण किंवा बालपणी आलेले अंधत्व यामुळे गमावलेली दृष्टी पुन्हा मिळवून देण्यात ह्या प्रत्यारोपणाचा महत्त्वाचा वाटा आहे..आमच्या रुग्णालयातील ट्रान्सप्लांट टीम, समुपदेशक, नेत्ररोग तज्ज्ञ या सर्वांच्या निष्ठेचे आणिकौशल्याचे हे प्रतीक आहे. नेत्रदान शाखेचाही ह्यात मोठा हातभार निश्चितच आहे.
रुग्णालयाच्या डॉ. प्रणव डी. मोरे आणि डॉ. ओ. के. राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील कॉर्नियल ट्रान्सप्लांट टीमने ७० टक्क्यांहून अधिक कॉर्नियल ग्राफ्ट यशस्वी करून सातत्यपूर्णउत्कृष्ट कामगिरी केली आहे. दरवर्षीऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पंधरा दिवस नेत्रदान जागरूकता वाढविण्यासाठी आमचे रुग्णालय विविध उपक्रम राबवते. यामध्ये नेत्रदानाबद्दल समाजाला जागरुक करण्यासाठी पोस्टर प्रदर्शने, नाट्यकला, पथनाट्ये आणिसार्वजनिक व्याख्याने यांचे आयोजन केले जाते, तसेच डॉक्टर, परिचारिका आणिकर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जातात.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (अभिमत विद्यापीठ) कुलपती डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, “उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा रुग्णांना देण्याच्या दृष्टीने आमचे डॉक्टर्सकायम तत्पर असतात. त्यासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक सुविधा आणितंत्रज्ञानाने आमचे रुग्णालय सुसज्ज आहे.१०१ कॉर्नियल प्रत्यारोपणाच्या उल्लेखनीय कामगिरी बरोबरच आम्ही ‘ना-नफा’सेवा उपक्रम चालू ठेवल्याचे वचन पाळल्याचा आम्हाला अभिमान आहे.अशा प्रभावी आरोग्यसेवांमध्ये आम्ही आघाडीवर असल्याचे समाधान आम्हाला आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (अभिमत विद्यापीठ) प्र कुलपती, डॉ. भाग्यश्री पी. पाटील म्हणाले, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात, आम्ही रुग्णांचे आयुष्य बदलण्यासाठी प्रगत वैद्यकीय पायाभूत सुविधांसहबरोबरच रुग्णांना आपुलकीने वागविले जाते व त्यांची योग्य काळजी घेतली जाते. संस्थेने पार केलेला १०१ कॉर्नियल प्रत्यारोपणाचा टप्पा हे समाजसेवेप्रतिअसलेले आमचे योगदान आहे. ह्यायोगे गरजू रुग्णांच्या आशा पूर्णकरण्याचे समाधान आम्हाला मिळते .
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (अभिमत विद्यापीठ) विश्वस्त आणिखजिनदार, डॉ. यशराज पाटील, म्हणाले, आमच्या संस्थेने गाठलेला १०१ कॉर्नियल प्रत्यारोपणाचा टप्पा हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. यातून समाजाची सेवा करण्यासाठी सामाजिक जबाबदारीची भावना आणिअत्याधुनिक वैद्यकीय सेवा एकत्रित उपलब्ध करण्याची आमची तळमळ दिसून येते.डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणिसंशोधन केंद्र, पिंपरी, पुणे,संस्थेच्या डीन डॉ. रेखा आर्कोट म्हणाल्या, आपल्या देशात कॉर्नियल अंधत्वाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी दरवर्षीसुमारे एक लाख कॉर्नियल प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे. सार्वजनिक आरोग्यासाठी हे एक मोठे आव्हान आहे. आमची १०१ कॉर्नियल प्रत्यारोपणाची यशस्वी कामगिरी या दिशेने टाकलेले एक लहान पण महत्त्वपूर्णपाऊल आहे. हे व्यापक वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी, अवयव दानाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणिअंधत्वाचा सामना करण्यासाठी उचललेले पाऊल असून त्यायोगे कुशल आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या पुढच्या पिढीला प्रशिक्षण देण्यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात आणि हे आमच्या
समर्पणाचे प्रतिबिंब आहे. आम्ही केवळ दृष्टी सुधारत नाही तर आमच्या रुग्णांच्या जीवनाची गुणवत्तादेखील
वाढवत आहोत. सुलभ आणिनाविन्यपूर्णआरोग्यसेवा उपायांचा प्रभावी परिणामही यातून दिसून येतो;
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणिसंशोधन केंद्र, पिंपरी, पुणेच्या नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. ओ.के. राधाकृष्णन म्हणाले, “ ह्या उपक्रमात सहभागी असलेल्या प्रत्येकाची कामगिरी उल्लेखनीय असून सांघिक कामगिरीचे आणिसमर्पणाचे हे उत्तम उदाहरण आहे.१०१ रुग्णांना दृष्टी परत मिळवून देणे हे आमच्या वचनबद्धतेचे पूर्णरूप आहे. आम्ही नावीन्यता आणिकरुणाभावाने केलेल्या सेवेला समान प्राधान्य देतो. आमच्या कॉर्नियल प्रत्यारोपण कार्यक्रमाचे यश आमची उत्कृष्ट दाता प्रणाली, प्रगत तंत्रे आणिरुग्णालय प्रशासनाकडून मिळणाऱ्या भक्कम पाठिंब्यावर आधारित आहे.”
१०१ रुग्णांना दृष्टी परत मिळवून देण्याची ही उल्लेखनीय कामगिरीतून डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणिसंशोधन केंद्राच्या वैद्यकीय सेवा आणिसामुदायिक सेवेच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब दिसते. अत्याधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्णतंत्रे आणिकरुणामय दृष्टिकोन यांच्या मिलाफातून संस्था रुग्णांचे आयुष्य बदलून टाकत आहे.
