Tuesday, September 22, 2026
Latest NewsMAHARASHTRA

अहिल्यानगर : ‘स्टडी स्मार्ट’ च्या वतीने उच्च शिक्षण आणि विदेशातील करिअर संधी या विषयावर मोफत  सेमिनारचे आयोजन

अहिल्यानगर :   अनुभवसंपन्न विदेश शिक्षण सल्लागार संस्था असलेल्या स्टडी स्मार्ट च्या वतीने  “उच्च शिक्षण आणि विदेशातील करिअर संधी” या विषयावर एक विशेष सेमिनार आयोजित करणार आहे. या सेमिनारचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विदेशातील शिक्षणासाठी लागणारी महत्त्वाची माहिती आणि मार्गदर्शन प्रदान करणे  आहे. 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत बॅन्क्वेट हॉल, अर्थ रेस्टॉरंट, GCM टॉवर, अहिल्यानगर  येथे होणार हा सेमिनार पूर्णपणे मोफत असल्याची माहिती स्टडी स्मार्टचे व्यवस्थापकीय संचालक चेतन जैन यांनी दिली. 

पुढे बोलताना चेतन जैन म्हणाले, या सेमिनार मध्ये  विद्यार्थ्यांना आणि पालकांना स्टडी स्मार्ट च्या तज्ज्ञ मार्गदर्शनातून विविध देशातील उच्च शिक्षणाच्या संधी आणि प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती मिळवता येईल. यामध्ये इंग्लंड, अमेरिका , जर्मनी, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, दुबई आणि इतर प्रमुख देशांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने सर्वोत्तम पर्याय निवडण्यास मदत केली जाईल.

या सेमिनारमध्ये IELTS मास्टरक्लास म्हणजेच  ब्रिटिश कौन्सिल आणि कॅम्ब्रिज प्रमाणित ट्रेनर कडून, ज्यामध्ये एक मॉक टेस्ट देखील आयोजित केली जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा तयारीचे मूल्यांकन होईल. याशिवाय विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्यासाठी प्रमाणित सल्लागारांसोबत संवाद. यामध्ये पार्ट-टाइम नोकरी, निवास व्यवस्था, शिष्यवृत्ती आणि वित्तीय संधी यावर सखोल चर्चा केली जाईल. तसेच विद्यार्थ्यांना विदेशातील संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक अर्ज आणि शिष्यवृत्त्या मिळवण्याबाबत मार्गदर्शन मोफत मिळणार आहे. या सेमिनार मध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून त्यासाठी  https://bit.ly/4aaGlpU या लिंकवर किलक करा किंवा 9970579637 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन चेतन जैन यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading