Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

भाजप महिला आघाडीच्या शिष्टमंडळाच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना निवेदन

पुणे: पुणे शहरातील विविध IT कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी काम करत आहेत. नुकतीच खराडी येथील आय टी कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्याचा तिच्या सोबत काम करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांनेच अत्यंत निर्घृणपणे खुन केल्याची घटना घडली आहे. ह्या पार्श्वभूमीवर पुणे शहर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शिष्टमंडळाच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त श्री.अमितेशकुमार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या

1) आपण शहरातील सर्व IT कंपन्यांना तातडीने स्वतंत्र महिला कर्मचारी सुरक्षा विषयक धोरण तयार करण्याबाबत निर्देश द्यावेत.

2) या कंपन्यांमधील कर्मचारी सुटण्याच्या वेळी संबंधित परिसरात महिला पोलीसांची गस्त सुरु करावी.

3) सर्व कंपन्यांच्या आवारातील CCTV यंत्रणेचे ॲाडीट करण्यात यावे व हे कॅमेरे चालू स्थितीत आहेत का? त्यांची संख्या पुरेशी आहे का? ते योग्य ठिकाणी लावले गेले आहेत का? याचा तपास करण्यात यावा.

4) या सर्व कंपन्यांना त्यांच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेमध्ये पूर्ण वेळ महिला सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे निर्देश द्यावेत.

तरी आमची आपणांस या निवेदनाद्वारे नम्र विनंती आहे की आपण वरील मागण्यांबाबत सकारात्मक विचार करुन याबाबत लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी
या बाबत ठोस पावले उचलण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले या शिष्टमंडळात महिला शहराध्यक्ष हर्षदा फरांदे, प्रियंका शेंडगे शिंदे स्वाती मोहोळ, गायत्री खडके नेहा गोरे अश्विनी कोसरीकर,मनीषा मोरे आणि खुशी लाटे यांचा समावेश होता

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading