Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

इंडियन मेडिकल असोसिएशन पुणेला राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार

पुणे : इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे ब्रांचला २०२३-२४ साठी राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट घोषित केले आहे. हैद्राबाद येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेतील दिमाखदार सोहळ्यात अध्यक्ष  डॉ राजू वरयाणी, सचिव डॉ. गीतांजली शर्मा व एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी डॉ. संजय पाटील यांनी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.‌ अशोकन यांच्या हस्ते हा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला.

आय एम ए पुणे ने २०२३-२४ या वर्षात केलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. त्यामध्ये डॉक्टरांसाठी आयोजित कार्यशाळा, ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्सेस, अनेक सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, लसीकरण मोहीम, खेडोपाड्यातील लोकांसाठी आरोग्यसेवा, परिचारिका व हॉस्पिटल कर्मचाऱ्यांसाठी फायर सेफ्टी, आत्मसंरक्षण, संवाद कौशल्य उपक्रम, मानसिक आरोग्य व वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मदत कार्य अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे. डॉक्टरांचे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन व हॉस्पिटल डॉक्टरांसाठी आयोजित राज्य स्तरीय हॉस्पिकॉन परिषद या वेगळ्या  उपक्रमांचा समावेश आहे. आय एम ए पुणे टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading