Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

उपेक्षित समुदायांच्या सक्षमीकरणासाठी समर्पित असलेल्या  पर्णकुटी संस्थेच्या 13 व्या वर्धापनदिनानिमित्त #RukengeNahi मोहिम

पुणे : उपेक्षित समुदायांच्या सक्षमीकरणासाठी समर्पित असलेल्या पुण्यातील अग्रगण्य सामाजिक संस्था, पर्णकुटी ने आपला 13 वा वर्धापन दिन अभिमानाने साजरा केला. 13 व्या वर्धापनदिनानिमित्त, पर्णकुटीने त्याचा उत्पादन युनिट ब्रँड, ‘लेबल पूर्णकुटी’ पुन्हा लॉन्च केला, तसेच या दिनाचे औचित्य साधून #RukengeNahi मोहिम सुरू केली असून हि संस्थेच्या सामाजिक कामाशी निगडित आहे.

प्रमुख पाहुणे सुरज महाजन [प्रोबेशनरी असिस्टंट कमिशनर, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता, आणि इनोव्हेशन विभाग, पुणे] आणि श्री. मुळे [पुणे महानगरपालिका, NULM विभाग’अधिकारी] यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. दोन्ही मान्यवरांनी पर्णकुटीच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि कौशल्य विकासाचे महत्त्व आणि सामुदायिक सक्षमीकरणातील शाश्वत पद्धतींवर प्रकाश टाकला.

पूर्णकुटीने 2011 पासून,  फॅशन, ब्युटी आणि फूड इंडस्ट्रीजमधील व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे, समुपदेशन आणि स्वयं-विकास सत्रांसह 10,000 हून अधिक जीवनांवर प्रभाव टाकला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट धारा या प्रमुख उपक्रमाने 1,800 हून अधिक लाभार्थींना टेलरिंग, मेकअप, मेहंदी आर्ट, कॅटरिंग आणि कॉटन बॅग इत्यादीमध्ये प्रशिक्षित केले आहे, ज्यात 50% पेक्षा जास्त लोकांना दरमहा ₹5,000 ते ₹15,000 पर्यंतचे शाश्वत उत्पन्न मिळते. मनोसाखा या प्रकल्पांतर्गत, पुणे आणि हैदराबाद मधील 1,100 हून अधिक मुलांनी इंग्रजी, मराठी आणि गणिताचे शिक्षण घेतले आहे, यामुळे शाळा गळती व बालमजुरी या सामाजिक प्रश्नांवर काम करता आले. पर्णकुटीने मीराई असेट  फाऊंडेशनच्या सहाय्याने प्रोजेक्ट मनोसाखा अंतर्गत उपचारात्मक शिक्षण नवीन केंद्र देखील सुरू केले आहे.  याचबरोबर,ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या सीएसआर फाउंडेशन अंतर्गत, मनोसाखा प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली. कोविड-19 साथीच्या संकटकाळात अनेक कुटुंबाना संस्थेचा आधार मिळाला.

पर्णकुटीने 2022 मध्ये, बुधवार पेठ, पुणे येथे एक केंद्र स्थापन केले.  ज्यात लाल बत्ती परिसरात व्यवसाय करणाऱ्या महिला, ट्रान्सजेंडर व्यक्ती आणि मुलांसह उपेक्षित गटांवर लक्ष केंद्रित केले. 2023 पर्यंत, शाश्वत उपजीविका आणि उज्वल भविष्य निर्माण करण्याच्या आपल्या ध्येयाला बळ देऊन व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी आणि उत्पन्न निर्मितीला चालना देण्यासाठी पर्णकुटीने  पुण्यात नऊ समुदाय केंद्रे सुरू केली आहेत. या वर्षी, पर्णकुटीने महत्त्वपूर्ण टप्पे गाठले, ज्यात एक सीएसआर माध्यमातून शिवण उदयोग केंद्राचा विस्तार करणे, वेगवेगळे व्यावसायिक प्रशिक्षण आणि शाश्वत व्यवसाय उभारणे यासाठी कार्यरत आहे. शाश्वततेला चालना देत, पुर्नकुटीने वापरलेल्या डेनिम, साड्या आणि दुपट्ट्यांचे पुनर्वापर करण्यासाठी, त्यांना उपयुक्त आणि सुंदर उत्पादनांमध्ये रूपांतरित करण्यासाठी, पर्यावरणपूरक पद्धतींना समर्थन देत लाभार्थींना अधिक सक्षम करण्यासाठी उपक्रम सुरू केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading