Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

विनोद हे मानवाला मिळालेले वरदान – प्राचार्य श्याम भुर्के

पुणे : जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी विनोद साहित्यही वाचावे. विनोद हे मानवाला प्राप्त झालेले वरदान आहे. रोज एक तरी विनोद सांगून घरातील डायनिंग टेबलवर हसरे विद्यापीठ करावे, असे मत साहित्य मंचचे कार्याध्यक्ष प्राचार्य श्याम भुर्के यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेतर्फे १० व्या दैवज्ञ साहित्य संमेलनाचे आयोजन स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले. त्यामध्ये ‘या बाळांनो वाचू या’ याअंतर्गत ग्रंथहंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाज श्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी, साहित्य संमेलनाध्यक्ष कृष्णी वाळके, स्वप्ना पेडणेकर, चंद्रशेखर दाभोळकर, उदयराव गडकरी, प्रसाद गडकरी यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य श्याम भुर्के यांनी बालकवींना अभ्यासाशिवाय अन्य गोष्टींची पुस्तके वाचली पाहिजेत असे सांगितले. ग्रंथ हंडी मधील पुस्तके बालकांना भेट देण्यात आली. अष्टभुजा दुर्गादेवी इस्टेट ट्रस्ट या संस्थेच्या यजमान पदाखाली हे आयोजन करण्यात आले कमिटीचे सरपंच अजय कारेकर, चिटणीस अरुण गडकरी, खजिनदार संजय चाचड, विश्वस्त नंदकुमार पेडणेकर रत्नाकर काकतिकर यांनी संमेलनात आयोजना करता विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading