साईबाबांच्या भव्य पालखी सोहळ्याला सुरवात
मुंबई : मुंबईत गुलाबी थंडीला सुरवात होताच साईबाबांच्या पालखी सोहळ्याला सुरवात होते. मुंबई ते शिर्डी अशा अनेक पालख्या मुंबई शहरातून शिर्डीकडे जात असतात. अशीच एक पालखी भांडुप येथून निघाली असून ३१ डिसेंबर रोजी ही पालखी शिर्डीला पोहचणार आहे. आज सकाळी भांडुप खेराडी कंपाऊंड येथून निघालेल्या या पालखी सोहळ्याला युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील उपस्थित होत्या.
भांडुप येथील साई भजन सेवा मंडळ हे गेले २६ वर्षे साईबाबांची पालखी काढतात. २३ ते ३१ डिसेंबर रोजी हा पालखी सोहळा साजरा केला जातो. आज सकाळी भांडुप खेराडे कंपाऊंड, गणेश नगर, मंगतराम पेट्रोल पंप शिवाजी तलाव, जंगल मंगल रोड, क्वारी रोड, एलबीएस मार्ग, सर्वोदय नगर, भट्टी पाडा मार्गे, मधुबन गार्डन येथून ठाणे, वर्तक नगर या ठिकाणी मुक्कामाला जाणार आहे. त्यानंतर भिवंडी मार्गे ही पालखी ३१ डिसेंबर रोजी शिर्डीला पोहचणार. आज सकाळी या पालखी सोहळ्याला युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील उपस्थित राहून साईबाबांच्या पालखीचे दर्शन घेतले.
