सरहद स्कूल आणि जूनियर कॉलेज मध्ये पारंपारिक वेशभूषा दिवस साजरा
पुणे : दिल्ली येथे भरवल्या जाणाऱ्या ९८ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून सरहद संस्थेकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत सरहद स्कूल आणि जूनियर कॉलेज कात्रज या शाखेमध्ये पारंपारिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात आला.
या दिवशी विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, जिजामाता, शिवाजी महाराज, येसूबाई ,ताराबाई, अहिल्याबाई होळकर, आनंदीबाई जोशी, स्वातंत्र्यवीर सावरकर , सावित्रीबाई फुले अशा अनेक वेशभूषा विद्यार्थ्यांनी धारण केल्या.
काही काळासाठी विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक काळातील संस्कृती, सामाजिक जीवन, त्यांची कार्य, त्यांचे विचार यांचे प्रकटीकरण केले. व आपल्या इतिहासाबद्दल असलेली ऐतिहासिक प्रेमाची प्रचिती दिली.
तसेच विद्यार्थ्यांनी विविध महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून महाराष्ट्रीय खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला .
या कार्यक्रमांना सरहद सीबीएसई स्कूलच्या मुख्याध्यापिका कविता वानखेडे, सरहद जुनियर कॉलेजच्या समन्वयक रुबीना देशमुख, पर्यवेक्षिका प्रियंका निगडे व अर्चना विंचू उपस्थित होते. पारंपारिक वेशभूषा दिवसाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पडवळ व सिराज खान यांनी केले.
