Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

वीच्या नवीन सुपर हिरो प्रीपेड प्लॅनमध्ये मध्यरात्रीपासून दुपारपर्यंत अनलिमिटेड डेटाचा लाभ मिळणार

  • डेटाचा भरभरून उपयोग करणाऱ्या युवकांच्या आणि महिलांच्या विविध गरजा पूर्ण करणारे अतिरिक्त डेटा लाभ

 

एकमेकांसोबत संवाद, शेयरिंग असो, शिक्षण, काम किंवा मनोरंजन असो, प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेट आवश्यक आहे, अखंडित डेटा उपलब्ध असणे ही काळाची गरज बनली आहे. अखंडित आणि चिंतामुक्त डिजिटल अनुभव प्रदान करण्याच्या आपल्या बांधिलकीला अनुसरून, भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी वी ने सादर केला आहे सुपर हिरो प्लॅन, भारतातील प्रीपेड युजर्ससाठी हा अनोखा प्लॅन वी ने तयार केला आहे.

डेटाचा उपयोग करण्याच्या नवनवीन पॅटर्न्सना अनुरूप असलेला सुपर हिरो प्लॅन युजर्सना डेटा संपण्याची चिंता न करता जास्तीत जास्त डिजिटल अनुभव घेता यावा यासाठी तयार करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये प्रीपेड ग्राहकांना रात्री १२ ते दुपारी १२ पर्यंत अनलिमिटेड डेटाचा आनंद घेता येईल. वी च्या अतिशय यशस्वी ठरलेल्या हिरो प्लॅनचा आधीच लाभ घेत असलेल्या, डेटा-सॅव्ही युवकांसाठी वी ने हा अजून जबरदस्त प्लॅन सादर केला आहे. सकाळच्या वेळेत कामांना प्राधान्य देणाऱ्या महिलांचे वेळापत्रक लक्षात घेऊन, अधिक जास्त डेटा लाभ मिळवून देत त्यांच्या गरजा देखील वी ने पूर्ण केल्या आहेत.

उर्वरित अर्ध्या दिवसासाठी वी अतिरिक्त डेटा लाभ देणार आहे जेणेकरून त्यांच्या ग्राहकांना अखंडित कनेक्टिविटीचा आनंद घेता येईल. वी सुपर हिरो रिचार्जमधून मिळणारे इतर प्रमुख लाभ:

  • वीकएन्ड डेटा रोलओव्हर: न वापरलेला वीकडे डेटा कॅरी फॉरवर्ड करून वीकएन्डला वापरता येईल, त्यामुळे युजर्सना अधिक डेटा वापर अधिक लवचिकपणे करता येईल.
  • डेटा डिलाईट: महिन्यातून दोनदा युजर्सना २ जीबी अतिरिक्त डेटा कोठेही अतिरिक्त शुल्क न भरता, वी ऍपमार्फत किंवा १२१२४९ डायल करून अनलॉक करता येईल.

सुपर हिरो प्लॅन दर दिवसाला  जीबी च्या किंवा यापेक्षा जास्त डेटा कोटा देणाऱ्या रिचार्ज पॅकसोबत उपलब्ध होईलमहाराष्ट्रनवी दिल्लीगुजराततामिळनाडूकेरळपश्चिम बंगालपंजाब आणि हरयाणा या राज्यांमधील युजर्स याचा लाभ घेऊ शकतीलकिंमत ३६५ रुपयांपासून पुढे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading