संचेती हॉस्पिटल तर्फे रस्ता सुरक्षा जागृतीसाठी बाईक राईड उपक्रम
पुणे : संचेती हॉस्पिटल तर्फे रस्ता सुरक्षा जागृतीसाठी रविवारी बाईक राईड उपक्रम आयोजित करण्यात आला. याअंतर्गत 60 बाईकर्सने सहभाग घेतला. संचेती हॉस्पिटल ते पवना धरण असा या रॅलीचा मार्ग होता. या उपक्रमाचा फ्लॅग ऑफ पुणे वाहतूक विभागाचे एपीआय सचिन खरात यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी संचेती हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.पराग संचेती, विपणन आणि डिजिटल विभागाच्या प्रमुख रुपल संचेती, संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशनचे प्रमुख डॉ.लवनिश त्यागी आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये सोलो वर्ल्ड बाईकर मरल याझरलू, बाईकरनी अशी ओळख असलेल्या उर्वशी पाटोळे अशा अनेक नामवंत बाईकर्सने सहभाग घेतला होता.
डॉ.पराग संचेती म्हणाले की, रस्ते अपघातामुळे अनेकांचा जीव धोक्यात येतो, इजा होते आणि अपंगत्व येऊ शकते. त्यामुळे सातत्याने रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत जागृती महत्वाची आहे.
सचिन खरात म्हणाले की,एखाद्या रुग्णालयाने रस्ता सुरक्षा जागृती करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अधिक जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल.
मरल याझरलू म्हणाल्या की,आपल्या घरी आपल्यावर प्रेम करणारे आपले कुटुंब वाट बघत असते याचे भान आपल्याला हवे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास आपण रस्ते अपघात टाळू शकतो.
