बीएसएनएल एम्पलोईज युनियन AIBDPA व BSNL CCWF च्या वतीने धरणे आंदोलन
पुणे : बीएसएनएल एम्पलोईज युनियन AIBDPA व BSNL CCWF च्या वतीने बीएसएनएल पीजीएमटी ऑफिस सातारा रोड येथे धरणा आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉम्रेड नागेशकुमार नलावडे अध्यक्ष महाराष्ट्र बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन, कॉम्रेड युसुफ जकाती परिमंडळ सचिव AIBDPA, कॉम्रेड संदीप गुळूंजकर, कॉम्रेड विकास कदम, कॉम्रेड पुष्पा फराटे, कॉम्रेड नफीस काझी यांनी आंदोलनास संबोधित केले. सूत्रसंचलन कॉम्रेड गणेश भोज यांनी केले.
या आंदोलनाच्या मुख्य मागण्या खालील प्रमाणे आहे.
1) बीएसएनएल च्या सर्व वर्किंग आणि रिटायर्ड कर्मचाऱ्यांना त्यांच्या पे रिविजन आणि पेन्शन रिविजन ताबडतोब लागू करा!
2) बीएसएनएल मध्ये 4G आणि 5G ताबडतोब लागू करा !
3) बीएसएनएल मध्ये कोणतेही व्हीआरएस लागू करू नका!
4) बीएसएनएल मधील कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स यांना किमान वेतन ईपीएफ आणि ई एस आय ताबडतोब लागू करा!
5) 7 वा पे कमिशन च्या पे स्केल कॅज्युअल लेबर आणि टी एस एम ना लागू करा!
बीएसएनएलच्या प्रगतीमध्ये व कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात नकारात्मक असलेल्या सरकार विरुद्ध.
आंदोलनाच्या वेळी सर्व कर्मचाऱ्यांनी मोबाईलच्या टॉर्च ऑन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला.
