Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

चेतन दत्ताजी गायकवाड हायस्कूल मध्ये संविधान दिन साजरा

पुणे : अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व विकास प्रतिष्ठान बावधन, यांच्यावतीने  भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  तसेच चेतन दत्ताजी गायकवाड हायस्कूल, सिद्धार्थ नगर बावधन येथे संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन व हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना लाडू वाटप करून संविधान दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडीचे  संघटक उमेश कांबळे, विकास प्रतिष्ठान बावधनचे अध्यक्ष स्वराज कांबळे यांनी केले होते. या कार्यक्रमाला बावधन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल   विभूते , पेरीविंकल ग्रुपचे   राजेंद्र  बांदल , ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत भूडे, माजी उपसरपंच दीपक दगडे पाटील , माजी सरपंच वैशाली कांबळे,   रेश्मा केदारी (अध्यक्ष पवित्र महिला सामाजिक संघटना),  रेखा सरोदे (अध्यक्ष सुजाता महिला मंडळ), उपाध्यक्ष आशा  भालेराव, सिद्धांत कदम, यशराज कांबळे, ज्ञानेश्वर साळवे, अजय पाचपुजे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading