Monday, June 8, 2026
BusinessLatest News

टाटा एआयए इन्शुरन्सच्या अ‍ॅपचे डाउनलोड्स १ दशलक्षांच्या पलीकडे

मुंबई : टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स (टाटा एआयए) या भारतातील आघाडीच्या जीवन विमा कंपनीने आपल्या कन्झ्युमर अ‍ॅपचे डाउनलोड्स १ दशलक्षांपुढे गेल्याचे जाहीर केले आहे. हा टप्पा ग्राहकांचा टाटा एआयए आणि त्यांचे मोबाइल अ‍ॅपकन्झ्युमर पोर्टल, व्हॉट्सअप अनेबल्ड सर्व्हिसेस अशा डिजिटल सुविधांवर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. या सुविधा डु इट युवरसेल्फ तत्वावर आधारित आणि कंपनीच्या ग्राहकांना त्यांचा जीवन विम्याचा प्रवास सोयीस्कर आणि सफाईदार पद्धतीने हाताळण्यासाठी सक्षम करणाऱ्या आहेत.

 

या आधुनिक अ‍ॅपच्या मदतीने ग्राहकांना कुठूनही आणि कोणत्याही वेळी आपल्या विमा योजना हाताळता येतील. त्यांना शाखेला भेट देण्याची गरज राहाणार नाही किंवा योजनेची कागदपत्रे प्रिंट करावी लागणार नाहीत. त्यांना हवी असलेली माहिती हाताच्या बोटांवर उपलब्ध असेल.

 

या अ‍ॅपद्वारे ६० प्रकारच्या सेवा 24×7 उपलब्ध असून त्यात प्रीमियम पेमेंट्स, क्लेम रिक्वेस्टचे ट्रॅकिंग, पोर्टफोलिओची अद्ययावत माहिती, सम अश्युअर्ड, फंडाचे मूल्य, नावीचे तपशील यांचा समावेश असेल. त्यामध्ये या क्षेत्रातील पहिल्यांदाच काही सुविधांचा- तत्काळ कर्ज समावेश असेल. या सुविधांमुळे ग्राहक अनुभव उंचावेल आणि व्यवहारांतील सोपेपणा वाढेल. आणखी एका अशाप्रकारच्या पहिल्याच सुविधेमध्ये तत्काळ ग्राहकसेवेचा समावेश असून त्यामुळे व्यवहार रियल- टाइममध्ये पूर्ण होतात व ग्राहकाला तत्काळ तशी सूचना मिळते.

सेवांवर आधारित सुविधांशिवाय या अ‍ॅपवर १२ आरोग्य आणि स्वास्थ्य सेवांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे युजर्समध्ये सर्वसमावेशक स्वास्थ्याला चालना मिळेल. त्यात आउटपेशंट सल्लासेवा, निदान, व्हर्च्युअल/ऑनलाइन सल्लासेवा, इमरजन्सी सेवा, भावनिक स्वास्थ्य, पोषण व्यवस्थापन यांचा समावेश असेल.

‘आम्ही कंपनीच्या डिजिटल सेवांमध्ये सातत्याने बदल आणि विस्तार करत ग्राहकांचा अनुभव उंचावण्यासाठी बांधील आहोत,’ असे टाटा एआयएच्या कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सौम्या घोष म्हणाल्या. ‘अ‍ॅप डाउनलोड्सचा टप्पा १ दशलक्षांवर जाणं ही केवळ एक आकडेवारी नाही, तर त्यातून ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करत त्यांना सर्वोत्तम सेवा देण्याची आमची बांधिलकी अधोरेखित होते.’

डिजिटायझेशन उपक्रमांवर सातत्याने लक्ष केंद्रित करत टाटा एआयएने स्ट्रेट थरो प्रोसेसिंग (एसटीपी) यंत्रणेसह तत्काळ वितरण प्रक्रिया उंचावली आहे. त्यामुळे आलेल्या चौकशीवर प्रभावी प्रतिसाद देणे शक्य होते. टाटा एआयएतर्फे ग्राहकांना आर्थिक वर्ष २४ मध्ये ९७ टक्के एसटीपी रेशिओसह सफाईदार डिजिटल सेवा देण्यात आली.

कंपनीची दर्जेदार पेमेंट सेवा देण्याची बांधिलकी अ‍ॅप टु अ‍ॅप नेटिव्ह युनिफाइड पेमेंट इंटरफेज (युपीआय) इंटिग्रेशनमध्ये आणि कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यूशिवाय (सीव्हीव्ही) व्यवहारांमध्ये दिसून आली आहे. टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सला आपल्या डिजिटल पायाभूत सुविधांविषयी अभिमान असून या आर्थिक वर्षात डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर कोणत्याही अडथळ्याशिवाय १०० टक्के वाढ दिसून आली. या विश्वासार्हतेमुळे ग्राहकांना कंपनीच्या महत्त्वाच्या सेवा कुठेही आणि कोणत्याही वेळी वापरता येतील.

गेल्या १२ वर्षांत दरमहा सक्रिय युजर्सची संख्या दोन पटींनी वाढली असून दैनंदिन व मासिक पातळीवर ग्राहक संवादाचे प्रमाण ११ टक्के आहे. सोयीस्करपणा आणि दर्जेदार ग्राहक सेवेमुळे अ‍ॅपने डिजिटल व्यवहारांत पाच पट वाढ नोंदवली आहे. युजरफ्रेंडली इंटरफेज आणि उपयुक्तता यामुळे या अ‍ॅप अँड्रॉइडवर ४.७ आणि आओएसवर ४.६ रेटिंग मिळाले आहे.

डिजिटल प्लॅटफॉर्मवरील ग्राहक समाधानाचा ९२ स्कोअर लक्षात घेता टाटा एआयएतर्फे ग्राहक समाधानाला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येते. पर्सिस्टन्सी रेशिओमध्ये टाटा एआयएसह विमा योजना रिन्यू करणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण दिसून येते. कंपनीने त्यासाठीच्या पाच निकषांपैकी चार निकषांमध्ये सर्वोच्च स्थान मिळवले असून त्यात १३ महिने पर्सिस्टन्सीचा समावेश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading