Tuesday, September 22, 2026
Latest NewsPUNE

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे केंद्रातर्फे आयोजित “दीक्षारंभ” कार्यक्रमाचा उत्साह शिगेला

पुणे :  डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे या संस्थेतर्फे आयोजित भव्य दीक्षारंभ परिचय कार्यक्रमात वैद्यकीय, दंतवैद्यकीय, दृष्टिमिती (ऑप्टोमेट्री) आणि संबंधित आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि हा या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा होता.

मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलच्या क्लिनिकल गव्हर्नन्सचे संचालक आणि प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे विचार मांडले आणि आरोग्यसेवेच्या पेशाचे महत्त्व आणि त्यासाठी लागणारी चिकाटी यातील अनेक बारकावे सांगितले. या कार्यक्रमासाठी कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. सौ.भाग्यश्री पी. पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सचिव डॉ. स्मिता जाधव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीचे खजिनदार डॉ. यशराज पी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे सचिव डॉ. सोमनाथ पी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्राच्या अधिष्ठाता डॉ. ए. रेखा, डॉ. डी. वाय. पाटील दंतवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. डी. गोपालकृष्णन आणि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. जे. एस. भवाळकर हे मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक, सदस्य, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यमान विद्यार्थ्यांनी नव्या तुकडीचे मनःपूर्वक स्वागत केले. परिचय भाषणांसोबतच या समारंभात संस्थेची मूल्ये, ध्येय उद्देश, आचारसंहिता, शैक्षणिक अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांना सहाय्य करण्यासाठी उपलब्ध असलेल्या साधनांची माहिती देण्यात आली.

मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलच्या क्लिनिकल गव्हर्नन्सचे संचालक आणि प्रमुख डॉ. अविनाश सुपे आपल्या प्रेरणादायी भाषणात म्हणाले, “डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात प्रवेश मिळवल्याबद्दल तुमचे अभिनंदन. हा तुमच्या मेहनतीचा आणि उत्कृष्टतेचा सन्मान आहे. या संस्थेमध्ये आधुनिक सुविधा आणि प्रगत शैक्षणिक वातावरण उपलब्ध आहे. येथे तुम्हाला तांत्रिक कौशल्यासोबत नेतृत्वगुण, समस्या सोडवण्याची क्षमता आणि नैतिक निर्णय घेण्याचे कौशल्य विकसित करता येईल, जे बदलत्या आरोग्य क्षेत्रात महत्त्वाचे आहेत. या परिवर्तनशील प्रवासाची सुरुवात करताना मिळालेल्या संधींचा पुरेपूर फायदा घ्या. यातून तुम्ही जिद्द, नवकल्पना आणि सहकार्याची भावना विकसित करू शकता. या कौशल्यामुळे जागतिक वैद्यकीय क्षेत्रात तुमचे वेगळे स्थान निर्माण होईल. लक्षात ठेवा, खरे यश हे फक्त तुम्हा काय साध्य केले यात नसून प्रत्येक टप्प्यावर तुम्ही दाखवलेला प्रामाणिकपणा, सहानुभूती आणि समर्पण यामध्ये आहे.”

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे (अभिमत विद्यापीठ) या संस्थेचे कुलपती सन्माननीय डॉ. पी. डी. पाटील यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसोबतच विद्यार्थ्यांमध्ये खऱ्या आरोग्यसेवा नेतृत्वासाठी आवश्यक मूल्ये विकसित करण्याच्या बांधिलकीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “आज आपल्या नव्या विद्यार्थ्यांसाठी एक अद्भुत प्रवासाची सुरुवात आहे. ते समर्पण आणि उत्साहाने आरोग्य क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात आम्ही विद्यार्थ्यांना आवश्यक ज्ञान आणि कौशल्य देण्यासोबतच त्यांच्यातील आरोग्यसेवा नेतृत्व घडवणारी मूल्ये रुजवण्यावर भर देतो. हे विद्यार्थी पुढे जाऊन संवेदनशील व सक्षम व्यावसायिक होतील आणि अगणित व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतील, हे पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे (अभिमत विद्यापीठ) या संस्थेच्या प्र-कुलपती सन्माननीय डॉ. भाग्यश्री पाटील यांनी अभिमान व उत्साह व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा, जागतिक दर्जाचे शिक्षण आणि नावीन्यता व संशोधनाला चालना देणारे वातावरण मिळते. शैक्षणिक उत्कृष्टतेच्या पलीकडे जाऊन, आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत. त्यांच्यात संवेदनशीलता आणि धाडसी गुण रुजविण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून ते आत्मविश्वासाने आणि ठाम निर्धाराने आरोग्यसेवा करतील. हा प्रवास आत्मविश्वास आणि संवेदनशीलतेने स्वीकारा. कारण तुम्ही तुमचे भविष्य घडवविण्यासोबतच आरोग्यसेवेच्या नव्या युगाची सुरुवात करत आहात. तुमच्या या प्रवासातील प्रत्येक पावलावर आम्ही तुम्हाला सहाय्य करू आणि या प्रवासात उत्कृष्टता साध्य करण्यासाठी आणि अर्थपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी आवश्यक असलेली साधने व मार्गदर्शन तुम्हाला मिळेल, याची आम्ही खातरजमा करू.”

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ विद्यापीठ सोसायटीच्या सचिव डॉ. स्मिता जाधव यांनी या प्रसंगी आपले विचार मांडले. त्या म्हणाल्या, “डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठात आम्ही शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देतोच, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने नेतृत्व घडविण्यासाठी मूल्ये व आव्हानांवर मात करण्याची मूल्येही रुजवतो. आमचा अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असतो, जिथे विद्यार्थी शैक्षणिक उत्कृष्टता साध्य करण्यास सक्षम होतील, चाकोरीबाहेरचा विचार करतील आणि त्यांच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर ते सहानुभूती आणि प्रामाणिकपणा जपतील. आम्हाला खात्री आहे की, आमचे विद्यार्थी आरोग्यक्षेत्रातील आव्हानांवर मात करतील आणि लोकांच्या व समाजजीवनावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या उत्कृष्टतेचा व सेवाभावाचा वारसा निर्माण करतील.”

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे (अभिमत विद्यापीठ) या संस्थेचे खजिनदार सन्माननीय डॉ. यशराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना सहाय्य करण्याच्या विद्यापीठाच्या निर्धारावर भर दिला. ते म्हणाले, “उत्कृष्टता साध्य करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आम्ही विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्याचा विचार करणारे शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देतो. या वातावरणात विद्यार्थी त्यांच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करून सक्षम होतात. कठोर शैक्षणिक अभ्यासक्रम आणि नाविन्यपूर्ण पद्धती यांचा समन्वय साधणे हे आमचे ध्येय आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थी केवळ करिअरसाठी नव्हे, तर वेगाने बदलणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील नेतृत्वासाठी तयार होईल. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. त्यांना समाजात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी आणि जीवन बदलण्यासाठी आवश्यक साधने, ज्ञान आणि जिद्द प्रदान करतो.”

डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे, या संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. रेखा अर्कोट म्हणाल्या, “डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे येथे प्रवेश घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन. ही संस्था आधुनिक सुविधा आणि विद्यार्थी-केंद्रित शैक्षणिक वातावरणासाठी ओळखली जाते. आम्ही विस्तृत शैक्षणिक कार्यक्रम आणि अत्याधुनिक संशोधन व सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध असलेली आरोग्यसेवा यासाठी कटिबद्ध आहोत. यामुळे शैक्षणिक आणि व्यावसायिक यशासाठी आवश्यक पाया घातला जातो. आमच्या व्यवस्थापनाच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, विद्यार्थ्यांना अभ्यासेतर आणि अतिरिक्त शैक्षणिक संधी असलेले वातावरण मिळते. यामुळे आयुष्यभरासाठी शिकण्याची सवय आणि प्रभावी करिअरसाठी योग्य पायाभरणी होते.”

प्रवेश कार्यक्रमात कॅम्पसमधील सुविधा पाहण्याचा दौरा आणि विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करण्यासाठी संवादात्मक सत्रांचा समावेश होता. विविध वैद्यकीय शाखांमधील विद्यार्थ्यांसाठी टीमवर्क, नैतिक आचरण आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला. यामुळे ते आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी तयार होतील, याची खातरजमा होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading