जगभरात रस्ते अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींचे स्मरण दिवस म्हणून रांगोळीच्या माध्यमातून श्रद्धांजली.
पुणे : नोव्हेंबर महिन्यात येणारा तिसरा रविवार जगभरात रस्ते अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींचे स्मरण दिवस म्हणून पाळला जातो , वाहन चालकांना वाहतूक सुरक्षिततेचे धडे मिळावे व कमीत कमी अपघात होण्याकरिता, प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे, पुणे पोलीस वाहतुक शाखा, व महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेच्यावतीने आज कात्रज येथील
राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्य प्राणी संशोधन केंद्राच्या आवारात भव्य ,दिव्य रांगोळीच्या माध्यमातून,मेणबत्त्या लावून अपघातात मृत पावलेल्या व्यक्तिंना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील निरीक्षक अमित मुंडे ,धुळदेव कोकरे,प्रशांत थोरात. पुणे वाहतूक पोलीस शाखेतील सोनाली भोसले, अशोक वाघुले,विशाल ढोबाले ,रवींद्र गायकवाड, महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार दुग्गल, विठ्ठल मेहता, महेश शिळीमकर ,कृष्णा दाभाडे, ऐकनाथ ढोले,भारत गायकवाड, संदीप ढेरंगे,
महेश ड्रायव्हिंग स्कूलचे कर्मचारी पांडुरंग ढेबे, योगेश दिघे, श्रीशैल शिंगे, सचिन देशमुख, शिवनाथ घोडके, प्रशांत मेमाणे, सचिन ठाकूर, गणेश मानकर, अक्षय लोंढे, ऋषिकेश नाईकनवरे, सागर ढेबे आदि मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक महेश शिळीमकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
