Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

काँग्रेसच्या प्रचार समितीत मोहन जोशी यांचा समावेश

पुणे – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विधानसभा निवडणूक प्रचार समितीमध्ये माजी आमदार, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या नियुक्तीची घोषणा केली. खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार समिती नेमण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश संघटनेत मोहन जोशी यांनी विविध पदांवर काम केले असून, त्यांनी कर्नाटक, तेलंगण आदी १२ राज्यांमध्ये निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. महाराष्ट्र प्रदेश पार्लमेंटरी बोर्डाचेही ते सदस्य आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. विधानसभा निवडणुकीतही आघाडीचेच सरकार येईल, प्रचारही एकजुटीने चालू आहे. त्या दृष्टीने पक्ष आणि आघाडीचा प्रचार हिरीरीने करेन, अशी प्रतिक्रिया मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading