Thursday, June 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

कलर्स मराठीवरील ‘दुर्गा’मध्ये अभिषेकच्या प्रश्नांनी घेतली नवी कलाटणी – काय असेल दुर्गाचे उत्तर ?

 

पाहा.. ‘दुर्गा’, दररोज, संध्याकाळी 7:30 वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर

महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि सर्वांच्या मनावर राज्य करणारी ‘दुर्गा’ मालिका प्रेक्षकांसाठी दर दिवशी नव्या उत्कंठावर्धक वळणांचा प्रवास घडवत आहे. दुर्गाचा दादासाहेब मोहिते यांच्याशी सुडाचा प्रवास आणि तिच्या प्रेमामुळे घेतलेले धाडसी निर्णय प्रेक्षकांना थक्क करत आहेत.

दुर्गाचा दादासाहेब मोहिते यांच्यावर सुड उगवण्याचा निर्धार तिच्या वडिलांच्या हत्येपासून आहे. हे प्रेक्षकांसाठी चकित करणारे आहे. तिला हे देखील ठाऊक आहे की, अभिषेक हाच मोहिते परिवराचा मुलगा आहे. परंतु दुर्गाने प्रेमाच्या बळावर त्याच्याशी लग्न केले.

आजच्या भागात प्रेक्षक एक महत्त्वपूर्ण वळण पाहणार आहेत अभिषेक दुर्गाला तिच्या मोठ्या सत्याबद्दल प्रश्न विचारतो. “तू माझ्या पासून काही लपवले आहेस का?” असा प्रश्न तो दुर्गाला विचारत आहे.

या प्रश्नावर दुर्गा काय उत्तर देणार? तिच्या मनातील गूढ सत्याचा उलगडा होणार का? या रहस्यमय उलगड्यावर प्रेक्षकांची उत्कंठा अधिकच वाढणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading