Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

पीएमसी आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांची शिवसृष्टीला भेट

 

पुणे  : पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी नुकतीच आंबेगाव (ब्रुद्रुक, पुणे ४११ ०४६) येथील ‘शिवसृष्टी’ ला भेट दिली. आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क असलेल्या,  कै. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि छ्त्रपती महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या  शिवसृष्टीतील विविध विभागांची यावेळी भोसले यांनी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाची माहितीही समजावून घेतली. प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यावेळी उपस्थित होते. पवार यांनी भोसले यांचा शाल, कवड्यांची माळ देत सन्मान केला.

यावेळी भोसले यांनी शिवसृष्टीच्या गाईडस् ला देखील मार्गदर्शन करीत त्यांच्यासोबत चर्चा केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading