Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पक्षविरोधी काम करणाऱ्याची रिपाइं मधून हकालपट्टी

 

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहराच्या वतीने विधानसभा निवडणूकीचे तिकीट वाटप प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रचार न करण्याचे कार्यकर्त्यांना सूचित करण्यात आले होते. तरीही कोथरूड मतदार संघातील बाळासाहेब खंकाळ महायुतीच्या प्रचाराता उपस्थित होते त्यामुळे पक्षे विरोधी काम करत असल्याने त्यांच्यावर पक्षाच्या वतीने सर्वानुमते हकालपट्टी ची कारवाई करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

सोनवणे यांनी पुढे सांगितले की, यापुढे बाळासाहेब खंकाळ यांना पक्षाच्या कुठल्याही पदाचा वापर करण्यात येणार नाही, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, वडगावशेरी विधानसभा अध्यक्षपदी पक्षाच्या वतीने अधिकृतपने विनोद टोपे हे अध्यक्ष असतील तसेच कोथरूड मतदारसंघाच्या अध्यक्ष पदी भारत भोसले असतील. शहर अध्यक्षाच्या सहमतीने व सहयाने शहरातले इतर सर्व पदाची नियुक्ती करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही संजय सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading