Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

वसंत देशमुखांचे स्त्री विरोधी विधान भाजप ची ‘मनोवृत्ती’ स्पष्ट करणारे’..! काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांची संतप्त टिका ..!

पुणे : देशात शिव छत्रपतींचा महाराष्ट्र ‘पुरोगामी विचारांचे प्रगतीशील राज्य’ म्हणून ओळखले जात होते. समतेचे प्रणेते राजर्षी शाहू, महीला शिक्षणाचे प्रणेते सावित्री-ज्योती फुले दांम्पत्यांच्या महाराष्ट्रात आता राजकीय द्वेष व असुयेने पछाडलेले ‘सत्तांध भाजपनेते नाती समान मुलीस’ घराबाहेर पडू न देण्याच्या जाहीर धमक्या देत असतील व विकृतीने पछाडलेले टोळ – भैरव टाळ्या वाजवत असतील तर राज्यातील कायदा सुव्यवस्था ही ‘त्रिकुट सरकारने’ मोदी शहां’कडे गहाण टाकल्याची पावती असल्याची संतप्त टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी निव्दनात केली..!
ते पुढे म्हणाले की, संगमनेर येथील विखेंच्या प्रचार सभेत डॅा जयश्री बाळासाहेब थोरांताचे प्रती भाजप नेते वसंत देशमुखांनी घरा बाहेर पडू देणार नाही हे वक्तव्य दमनशाहीचे प्रतीक असून, महायुतीच्या राज्यकर्त्यांची महीला – स्त्री विरोधी मानसिकता स्पष्ट करणारे, स्त्रीयांना शिक्षण हक्कांपासून प्रतिरोध करणाऱ्या प्रतीगामी विचारांचे द्योतक आहे.
राज्यातील जनतेने आपल्या मुलीबाळींना निर्भय वातावरणात ‘सबला’ बनवायचे आहे की ‘भिती – धाक दपटशहाच्या वातावरणात ‘अबला’ बनवायचे आहे हे विचार करण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात केले..!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading