Assembly Election : महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा
नवी दिल्ली- भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) आज दुपारी पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र (Maharashtra) आणि झारखंड (Jharkhand) मधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून तीन दिवसांनी 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांची मतमोजणी 23 नोव्हेंबरला एकाच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकां (Maharashtra Assembly Elections) मधील महत्वाच्या तारखा
23 ते 29 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
30 ऑक्टोबर उमेदवार अर्जाची छाननी
4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेता येणार
20 नोव्हेंबरला राज्यात मतदान
23 नोव्हेंबरला मतमोजणी
