जिजामाता महिला सहकारी बँक लि.पुणे बँकेच्या अध्यक्षपदी सुजाता प्रदीप जगताप
पुणे : पुणे जिजामाता महिला सहकारी बँक लि.पुणे या बँकेच्या अध्यक्षा व उपाध्यक्षा यांची निवडणूक दि.०७/१०/२०२४ रोजी मुख्य कार्यालय मालती माधव,१६३९ बी, सदाशिव पेठ,पुणे. येथील सुशीलानंद सभागृहात संजय राऊत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर, पुणे. यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुजाता प्रदीप जगताप (अध्यक्षा) व पूजा मयुर वांजळे (उपाध्यक्षा) यांची बिनविरोध निवड झाली.
बँकेला सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात रु.२.८२ कोटी नफा झाला असून बँकेचे नेट एन.पी.ए.०.३१% इतके आहे. बँकेची ५१ वी वार्षिक सर्व साधारण सभा दिनांक० ५/०९/२०२४ रोजी पार पडली. बँकेच्या ठेवी रु. ४०० कोटी, कर्ज व्यवहार रु. २५० कोटी आहेत. भाग भांडवल रु. १४.७४ कोटी, निधी रु. ३९.३९ कोटी आणि बँकेने गुंतवणूक रु. १६७.३३ कोटी केली आहे. बँकेस ऑडिट वर्ग अ प्राप्त झाला आहे. त्यावेळी बँकेने सभासद यांना ८% लाभांश तसेच बँकेतील सेवकाना 6% सानुग्रह अनुदान जाहीर केलेले आहे. बँकेचा नुकताच सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारंभ मोठ्या दिमाखात पार पाडला.
बँकेस दि. महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंक्स फेडरेशन लि. मुंबई. यांचे वतीने देण्यात येणारा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचा सर्वोत्कृष्ट महिला सहकारी बँक पुरस्कार जिजामाता महिला सहकारी बँक लि. पुणे या बँकेस दिनांक २८/०९/२०२४ रोजी पुणे येथील कार्यक्रमात केंद्रीय सहकार व हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे हस्ते प्रदान करण्यात आला तो माजी अध्यक्षा रत्नमाला म्हस्के व संचालिका सुजाता जगताप, पुजा वांजळे, मंगला भोजने, सुनीता शितोळे, सुरेखा शेलार आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य संग्राम गायकवाड तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी उमाकांत मुंगी यांनी स्वीकारला.
