Monday, June 8, 2026
BusinessLatest News

देशभरातील डिलिव्‍हरी सेवा वाढवण्‍यासाठी अमेझॉन आणि इंडिया पोस्‍टमध्ये सामंजस्‍य करार

पुणे : अमेझॉन ट्रान्‍सपोर्टेशन सर्विसेस प्रायव्‍हेट लिमिटेड (अमेझॉन इंडिया) आणि डिपार्टमेंट ऑफ पोस्‍ट्स (इंडिया पोस्‍ट) यांनी आज त्‍यांचा देशभरातील लॉजिस्टिक्‍स सहयोग अधिक दृढ करण्‍यासाठी धोरणात्‍मक सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केली. अमेझॉनची ग्राहक-केंद्रित व तंत्रज्ञान क्षमता आणि इंडिया पोस्‍टचे व्‍यापक लास्‍ट-माइल डिलिव्‍हरी नेटवर्क व दशकभराचे कौशल्‍य एकत्र करत या सहयोगाचा ई-कॉमर्स लॉजिस्टिक्‍समधील बेंचमार्क्‍सना नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याचा मनसुबा आहे. या सामंजस्‍य करारांतर्गत, दोन्‍ही कंपन्‍या विनासायास एकीकरण व माहितीची देवाणघेवाण करत कार्यसंचालनांवर देखरेख ठेवतील, ज्‍यामुळे कार्यक्षमतेमध्‍ये वाढ होईल, संसाधनांचा सानुकूलपणे वापर होईल आणि त्‍यांच्‍या लॉजिस्टिक्‍स नेटवर्क्‍समध्‍ये क्षमता शेअरिंगचा शोध घेता येईल. हा सहयोग परस्‍पर विकासाला चालना देईल, तसेच भारतातील दुर्गम व ग्रामीण भागांमधील अमेझॉन ग्राहकांसाठी डिलिव्‍हरी अनुभव अधिक उत्‍साहित करेल.

गेल्‍या २ ते ३ वर्षांमध्‍ये इंडिया पोस्‍टचे अमेझॉन लॉजिस्टिक्‍स नेटवर्कमधील फूटप्रिंट दुप्‍पटीहून अधिक वाढले आहे, जेथे देशभरातील पिकअप पॉइण्‍ट्सची संख्‍या ६ ठिकाणांवरून १३ ठिकाणांपर्यंत वाढली आहे. तसेच, अमेझॉन इंडिया पोस्‍टसोबत एण्‍ड-टू-एण्‍ड एकीकृत कॅश-ऑन-डिलिव्‍हरी सोल्‍यूशन देणारी पहिली ईकॉमर्स कंपनी बनली. यासोबत इतर सुधारणांमुळे गेल्‍या १८ महिन्‍यांमध्‍ये इंडिया पोस्‍टच्‍या माध्‍यमातून डिलिव्‍हर केल्‍या जाणाऱ्या अमेझॉन पार्सल्‍सच्‍या प्रमाणामध्‍ये जवळपास तिप्पट वाढ झाली आहे.

अमेझॉन इंडियाच्‍या कार्यसंचालनांचे उपाध्‍यक्ष अभिनव सिंग म्‍हणाले, ”इंडिया पोस्‍टसोबतचे आमचे संबंध भारतातील अमेझॉनच्‍या विकासगाथेसाठी महत्त्वाचे ठरले आहेत आणि देशभरात ईकॉमर्सला आविष्‍कार करण्‍याप्रती योगदान दिले आहे. दशकापासून भारतीयांना सेवा देणाऱ्या या प्रतिष्ठित संस्‍थेसोबत सहयोग करत आम्‍ही वर्षानुवर्षे लॉजिस्टिक्‍स व ग्राहकसेवेमध्‍ये नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करण्‍यास यशस्‍वी ठरलो आहोत. हा सहयोग अत्‍याधुनिक तंत्रज्ञान व प्रक्रियांचा वापर करत इंडिया पोस्‍टच्‍या सेवा आणि पोहोच वाढवण्‍यासोबत आधुनिकीकरण करण्‍याप्रती सरकारच्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न आहे.

डिपार्टमेंट पोस्‍टचे सचिव (पोस्‍ट्स) श्रीमती वंदिता कौल म्‍हणाल्‍या, ”जवळपास १६५,००० पोस्‍ट ऑफिसेसचे व्‍यापक नेटवर्क असलेले इंडिया पोस्‍ट देशभरातील ई-कॉमर्सचे लोकशाहीकरण करण्‍यासाठी अद्वितीयरित्‍या सुसज्‍ज आहे. अॅमेझॉनसोबतचा आमचा सहयोग डिजिटल तफावत दूर करण्‍याप्रती आमच्‍या प्रयत्‍नांमधील मोठी झेप आहे, ज्‍यामुळे सर्व नागरिकांसाठी ई-कॉमर्समध्‍ये वाढ होईल. माननीय दळणवळण मंत्री श्री. ज्‍योतिरादित्‍य एम. सिंधिया यांनी स्‍थापित केलेल्‍या दृष्टीकोनाशी संलग्‍न राहत सरकारने डिपार्टमेंट ऑफ पोस्‍ट्सला सुसज्‍ज लॉजिस्टिक्‍स सेवा प्रदातामध्‍ये बदलण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे. डिपार्टमेंट ऑफ पोस्‍ट्स लॉजिस्टिक्‍स आधारस्‍तंभ म्‍हणून आधुनिकीकरण व वाढीप्रती आमच्‍या प्रवासामधील धोरणात्‍मक सहयोगाच्‍या महत्त्वाला प्राधान्‍य देते.

अमेझॉन आणि इंडिया पोस्‍ट यांच्‍यामधील सहयोग भारतात ईकॉमर्सला सुरूवात झाल्‍यापासून आहे, जेथे अमेझॉन देशभरात ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍सची डिलिव्‍हरी करण्‍यासाठी पोस्‍टल सेवेसोबत काम करणारी पहिली कंपनी बनली. २०१३ मध्‍ये अमेझॉनने स्‍पीड पोस्‍टच्‍या माध्‍यमातून देशातील पहिले ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स कन्‍साइनमेंट डिलिव्‍हर करत या अग्रगण्‍य सहयोगाला सुरूवात झाली अमेझॉन आर्मी पोस्‍टल सर्विसच्‍या माध्‍यमातून लष्‍कर प्रतिबंधित ठिकाणी सेवा देणारी, तसेच नुब्रा व्‍हॅली (लेह), साऊथ गॅरो हिल्‍स (मेघालय), अंदमान निकोबार आयलँड्स इत्‍यादी सारख्‍या दुर्गम ठिकाणांपर्यंत ग्राहकांना सेवा देणारी एकमेव ई-कॉमर्स कंपनी बनली.

आज, हा सहयोग अद्वितीय पोहोच सक्षम करतो आणि अमेझॉनला भारतातील १६५,००० पोस्‍ट ऑफिसेसमधील जवळपास १९,३०० पिन-कोड्स व आर्मी ठिकाणी असलेल्‍या ग्राहकांना सेवा देण्‍यास मदत करतो. खरेतर, अमेझॉनचा इंडिया पोस्‍टसोबतचा सहयोग आता सीमेपलीकडील ट्रेडपर्यंत देखील वाढला आहे. गेल्‍या वर्षी तिसऱ्या तिमाहीमध्‍ये या दोन्‍ही कंपन्‍यांनी सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी करत एकीकृत क्रॉस बॉर्डर लॉजिस्टिक्‍स सोल्‍यूशन निर्माण केले, जे देशभरातील लाखो सूक्ष्‍म, लघु व मध्‍यम उद्योगांना (एमएसएमई) ईकॉमर्स निर्यात संधी देईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading