‘बिग बॉस मराठी’च्या घरात येणार DJ Kratex; आज होणार मिड वीक एव्हिक्शन
Bigg Boss Marathi Day 68 : ‘बिग बॉस मराठी’चा खेळ आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. शेवटच्या टप्प्यात आता हा खेळ आणखी रंगतदार होत चालला आहे. काहीच दिवसांत या पर्वाचा विजेता किंवा विजेती जाहीर होणार आहे. अशातच आज घरात DJ Kratex आपल्या स्टाईलने प्रेक्षकांचं आणि घरातील सदस्यांचं चांगलच मनोरंजन करणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आज घरात मिड वीक एव्हिक्शनदेखील पार पडणार आहे.
DJ Kratex हा भारतातील नावाजलेला डीडे आणि संगीत निर्माता आहे. विविध प्रकारच्या संगीताची आजवर त्याने निर्मिती केली आहे. तरुणांना त्यांचं वेगळच आकर्षण आहे. आता ‘बिग बॉस’प्रेमींवर आपली छाप पाडायला तो सज्ज आहे. प्रोमोमध्ये,’बिग बॉस’ म्हणत आहेत,”बिग बॉस मराठीच्या घरात आले आहेत DJ Kratex”. त्यानंतर घरातील सर्वच सदस्य DJ च्या तालावर कल्ला करताना दिसत आहेत.
‘बिग बॉस’ पुढे म्हणत आहेत,”आज होणार आहे या सीझनचं मिड वीक एव्हिक्शन..” त्यामुळे शेवटच्या आठवड्यापर्यंत पोहोचलेल्या कोणत्या सदस्याचा प्रवास आज संपणार याकडे आता ‘बिग बॉस’प्रेमींचं लक्ष लागलं आहे.
‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
