Sunday, June 7, 2026
Latest NewsSports

अनुराग ठाकूर यांची पुण्यातील ब्लेडस ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाला भेट

पुणे : माजी केंदीय मंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी पुण्यातील सहकार नगर येथे असलेल्या ब्लेड्स ऑफ ग्लोरी या सुप्रसिद्ध क्रिकेट संग्रहालयाला भेट दिली. यावेळी संग्रहालयाचे संस्थापक रोहन पाटे यांनी संग्रहालय स्थापन करण्यामागची भूमिका व येथील क्रिकेट वस्तूंचा संग्रह याविषयीची माहिती ठाकूर यांना दिली.

संग्रहालय पाहून झाल्यावर आपल्या भावना व्यक्त करताना अनुराग ठाकूर म्हणाले, “मी १७ वर्षांहून अधिक काळ क्रिकेट व्यवस्थापनात काम केले. मला देखील असे संग्रहालय साकारायचे होते पण हे काम माझ्याकडून झाले नाही. ते काम रोहन पाटे यांनी करून दाखवले. या संग्रहालयात असलेल्या क्रिकेट मधील ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार असलेल्या कित्येक वस्तूंनी माझे लक्ष वेधून घेतले. अशा प्रकारचा संग्रह आणि तोही इतक्या मोठ्या प्रमणात एकाच ठिकाणी ही खूप वैशिट्यपूर्ण बाब असून असे संग्रहालय अजूनतरी माझ्या पाहण्यात आले नाही.”

“आमच्या हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील क्रिकेट स्टेडियमला दरवर्षी सुमारे ५ लाख पर्यटक भेट देतात. क्रिकेटचा सामना सुरु नसताना देखील येथून दिसणारे विहंगम दृष्य येथे पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करते. पर्यटकांची या स्टेडीयमला भेट ही आणखी संस्मरणीय व्हावी म्हणून आम्ही लवकरच येथे काही नवीन सुविधा निर्माण करणार आहोत. यामध्ये स्थानिक पदार्थांचा आस्वाद देणारे खास फूड कोर्ट, स्थानिक कलाकारांनी घडवलेल्या कला वस्तुंचे दालन आणि ब्लेड्स ऑफ ग्लोरी सारखे एक क्रिकेट संग्रहालय आदी सुविधांचा समावेश असेल”, अशी माहिती यावेळी ठाकूर यांनी दिली.

“सात वर्षांपूर्वी धर्मशाळा येथील आमच्या या क्रिकेट स्टेडीयमला अशा प्रकारचे संग्रहालय उभारण्यासाठी मी रोहन पाटे यांच्याशी बोललो होतो. आता प्राधान्याने या संग्रहालयाचे काम हाती घेऊ. सदर संग्रहालयासाठी १५००० चौरस फुट इतकी जागा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये काही क्रिकेट वस्तू या आमच्या तर काही या ब्लेड्स ऑफ ग्लोरी या संग्रहालयातील असतील”, असे ठाकूर म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading