विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी हेंकेल पयत्नशील – रमित महाजन
पुणे : विर्घार्थाना वैज्ञानिक विषयांत रुची निर्माण करुन नवीन करिअर संधी निर्माण व्हाव्यात यासाठी हेंकेल अनेक ऑस्ट्रानॅमी लॅब उभारत असुन विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने त्या महत्वाच्या आहेत, असे उद्गार हेंकेल सी एस आर प्रमुख रमित महाजन यांनी काढले. खडकी शिक्षण संस्थेच्या वतीने नव्याने स्थापित केलेल्या केस्त्रो ॲस्ट्रॉनॉमी लॅबच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी फर्ग्युसन महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. वसंत वाघ, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, रिजनल मॅनेजर, भूपेश सिंग, सचिव आनंद छाजेड, लायन्स क्लब पुणे सहकार नगर अध्यक्ष श्रद्धा हाते, ,प्राचार्य व सहसचिव डॉ. संजय चाकणे, संचालक अजय सूर्यवंशी, रमेश अवस्थे, ज्ञानेश्वर मुरकुटे, राजेंद्र भुतडा, प्रोफेसर विशाल कुंभारे, हेंकेल इंडियाचे रिसर्च डेव्हलप मेट मॅनेजर डॉ. प्रसाद खंडागळे , कीर्ती काटकर, मनाली भोसले, डॉ किशोर राजदेव आदी मान्यवर उपस्थित होते.
केस्त्रो लॅबच्या माध्यमातून ज्ञानोपासना वाढीस लागणार असून सामाजिक उन्नतीच्या दृष्टीने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे मत फर्ग्युसन महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. वसंत वाघ यांनी व्यक्त केले. नेहमीच्या साचेबद्ध शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक अभ्यासाकडे कल वाढवण्याचा हा विकसनशील प्रयोग आहे.
या प्रसंगी हेंकेल इंडियाचे रिसर्च डेव्हलप मेट मॅनेजर डॉ. प्रसाद खंडागळे यांनी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात या लॅब होत असल्याची व आतापर्यंत 10 लॅब कार्यरत झाल्याची माहिती दिली.
यावेळी संस्थाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी, या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कसलीही अडचण येऊ नये यासाठी सर्व सुविधायुक्त शिक्षण खडकी शिक्षण संस्थेमध्ये दिले जात आहे. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने काळाची गरज ओळखून आवश्यक त्या शिक्षण पद्धती संस्थेमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रतिपादन केले.
या प्रसंगी संस्था सचिव आनंद छाजेड यांनी संस्थेमध्ये होत असलेल्या अमुलाग्र बदलांचे कौतुक केले.
डॉ. संजय चाकणे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी केस्त्रो ॲस्ट्रॉनॉमी लॅबचा पुरेपूर वापर करून नासा पर्यंत झेप घेऊन आपल्या संस्थेचे नाव मोठे करावे.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यकारी अधिकारी डॉ. गजानन आहेर, मुख्याध्यापक उद्धव घाडगे, प्राचार्या सरिता नायर, संस्थेच्या सर्व विभागातील प्राध्यापक मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब थोरात यांनी तर आभार वैशाली वाघ यांनी मानले
