Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

Pune : तरुणीवरील अत्याचार प्रकरणी संबंधित संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे : कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनच्या परिसरातील नामांकित महाविद्यालयातील मुलीवर बलात्कार झाल्याच्या अनुषंगाने रिपब्लिकन विद्यार्थी सेना तसेच विविध संघटना आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी नुकतीच मा पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेबांची भेट घेऊन सदर संस्थेचे ट्रस्टी आणि इतर अधिकारी यांच्यावर बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
सदर संस्थेचे ट्रस्टी आणि अधिकारी विद्यार्थिनींना सुरक्षितता पुरविण्यास तसेच त्यांनी तपास यंत्रणेस तपासकामी योग्य माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने तेही जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होणे आवश्यक आहे या आणि अनेक विषयाच्या अनुषंगाने यावेळी शिष्टमंडळाने चर्चा केली. सदर शिष्टमंडळात रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विवेक बनसोडे, रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे, आरपीआय चे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष निलेशभाऊ आल्हाट,
रिपब्लिकन कामगार सेना पुणे जिल्हा अध्यक्ष हनुमंत अण्णा पपुल,सामाजिक कार्यकर्ते अतुल उर्फ बंडू पाटील,सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत,सामाजिक कार्यकर्ते शफीक शेख,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी अजरभाई शेख,प्रशांत सोनवणे, राजेश कचरे,राजेश परसाळे,इत्यादी मित्र परिवार उपस्थित होते
सदर ट्रस्टिंच्या विरोधात गुन्हे दाखल न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिष्टमंडळाने यावेळी दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading