Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

महाविकास आघाडीचे पुण्यावरचे प्रेम हे पुतणा मावशीचे प्रेम – चंद्रकांत पाटील

विकासपुरुष आपले लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदीजी यांची आजची नियोजित सभा व अनेक विकासकामांच्या उदघाटनांचा कार्यक्रम रद्द झाला.
हा कार्यक्रम पंतप्रधानांच्या कोणत्याही वैयक्तिक कारणामुळे किंवा भाजपच्या दुसऱ्या कार्यक्रमामुळे रद्द झाला नाही.
हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे आणि गेल्या २ दिवसापासून पुण्यात जोरदार पाऊस सुरु आहे, पुढे हि एक दोन दिवस असाच पाऊस सुरु राहणार आहे.
या कारणामुळे मोदीजींचा आजचा नियोजित दौरा पंतप्रधान कार्यालयाकडून रद्द करण्यात आला आहे.

संवैधानीक पदांवर असलेल्या व्यक्तींना दौर्याबाबत आपल्याला हवे तसे निर्णय प्रत्येकवेळी घेता येत नाहित.
नैसर्गिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीची पाहणी करुन संबंधीत व्यक्ती ज्या पदावर आहे त्या पदाची सुरक्षा यंत्रणा जो सल्ला देईल तो त्यांना पाळावा लागतो.

महाविकास आघाडीचे पुण्यावरचे प्रेम हे पुतणा मावशीचे प्रेम आहे.
त्यातही त्यांची एकवाक्यता नाही.
कसब्याचे आमदार व काँग्रेसचे नेते धंगेकर यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली आणि राष्ट्रवादी (शप) गटाने स्वतंत्र पणे भूमिका मांडली.
दोन तीन अपवाद सोडता महाविकास आधाडीतील घटकपक्षांचीच सत्ता पुण्यात राहिली आहे.
या विस्तृत सत्ताकाळात यांनी शहराचं काय भलं केलं ते सांगायला यांच्याकडे काही नाही.

पुण्याची सर्वात महत्वाची समस्या आहे वाहतूक.
हा प्रश्न सोडवण्यापेक्षा वाढवण्याचे पाप काँग्रेस व राष्ट्रवादीने केले आहे.
आपल्या कॉन्ट्रॅक्टरला सोयीचे जाईल अशा पद्धतीने BRT चे नियोजन केले गेले. पुणेकरांचे अतोनात हाल झाले पण प्रश्न मात्र अजिबात सुटला नाही.
सबसे बडा खिलाडी आणि पुण्यातील सर्वात जास्त पेट्रोल पंप व चारचाकी ची एजन्सी ज्याच्याकडे आहे तो सार्वजनिक वाहतूक सुधारून कशाला स्वतःच्या पोटावर पाय आणेल. तसेच स्वयंघोषित जाणते राजे सुद्धा पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या स्वतःच्या मित्रांच्या दुचाकी किंवा चारचाकी च्या व्यवसायास का अडचणीत आणेल?
डांबरी रस्ता लवकर खराब होतो म्हणून काँक्रीटचे रस्ते भाजप सत्तेत आल्यावरच सुरु झाले.
१९५२ साली पुणे महानगरपालिकेची स्थापना झाली, २०१७ पर्यंत एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच उड्डाणपूल होते. आता ऊड्डाणपुलांमुळे वाहतूक गतिमान झाली आहे.
१९८४ साली भारतात कोलकातामध्ये धावली. पुण्यात त्यासाठी २०२१ उजाडावे लागले.
भाजपच्या काळातच मेट्रो सुरु झाली. भविष्यात मेट्रो पुण्याच्या चारही दिशांना धावणार आहे.
पुणे दौंड तळेगाव लोणावळा मार्गावर EMU, दौंड पुणे लोकल इ. साठी पाठपुरावा करून त्याचे काम वेगात सुरु आहे.
पुण्याच्या विमानतळाचा विकास सुद्धा भाजपामुळेच झाला आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणाची संख्या वाढली आहे. जगाशी थेट संपर्क वाढल्याचा मोठा फायदा शहराला होणार आहे.
चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. ८६५ कोटी खर्च करून आज चांदणी चौक मोकळा श्वास घेत आहे.
नगर रोड, सोलापूर रोड यांवरही मोठ्या प्रमाणात विकासकामे करून वाहतूक कोंडी सुटत आहे.

पाणीप्रश्न, घनकचरा, प्रदूषण, या मुद्द्यांवर सुद्धा कोणतेही ठोस काम काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने केले नाही.
फक्त खोटे नॅरेटिव्ह लोकांसमोर मांडायचे आणि सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंट करायचा हेच त्यांचे धोरण आहे.

काल संध्याकाळी फक्त ३ तासात १३१ मिमी इतका पाऊस पडला आहे. हा पाऊस गेल्या ८६ वर्षातील एका दिवसातीळ सर्वात जास्त पडलेला पाऊस आहे.
अशा ढगफुटीवेळी कोणत्याही शहरातील पायाभूत सुविधा काही काळासाठी अपयशी ठरू शकतात.
परंतु पुण्यात वाहतूक लगेच सुरळीत झाली. अशा अस्मानी संकटाचे घाणेरडे राजकारण फक्त आणि फक्त काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते.
अशा संकटांच्यावेळी खरे तर एकत्र शहरासाठी येऊन ‘वयं पंचाधिकं शतं’ अशी भूमिका घेण्याची संधी त्यांनी घालवली. आणि आपल्या स्वार्थी व विकासविरोधी राजकारणाचे प्रदर्शन मांडले. हे सर्व लोकांसमोर आले हे सुद्धा एका अर्थी योग्यच झाले.

मुंबईमध्ये मेट्रोला विरोध करणारे पुण्यात मेट्रोचे उदघाटन एक आठवडा पुढे ढकलले गेले म्हणून नक्राश्रू काढत आहेत.
त्यांचा खरा विरोध हा आज होणाऱ्या २२,६०० कोटी रुपयांच्या विकासकामांना आहे.
मोदी सरकार सर्वसामान्य जनतेचा विचार करून सर्वत्र विकास करत आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव समोर दिसत आहे.
काहीही करून माध्यमामध्ये प्रसिद्धी मिळावी म्हणून चाललेला हा केविलवाणा प्रयत्न आहे.
पुणेकर जनतासुद्धा या सर्व प्रकाराकडे असेच पाहत आहे यात शंका नाही.
लवकरात लवकर पुन्हा मोदीजी पुण्यात येऊन पुण्याच्या विकासाचे नवीन पर्व लिहिणार यात आता कोणताही किंतु नाही.
अशा हजारो अस्मानी व महाविकास आघाडीसारख्या सुलतानी संकटांना भाजप कार्यकर्ता पुरून उरला आहे.

  • चंद्रकांत पाटील

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading