धारावीमध्ये तणावाची परिस्थिती
मुंबई: धार्मिक स्थळांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यावरून धारावीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून संतप्त जमावाची समजूत काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
धारावीमध्ये एका प्रार्थनास्थळाचे अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी महापालिकेचे पथक आले असता जमावाने रस्त्यावर उतरून या कारवाईला विरोध केला. शेकडो नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन कारवाई स्थगित करण्यात आली आहे.
कारवाईला विरोध करणारा जमाव रस्त्यावर ठाण मांडून बसला आहे. पोलिसांनी जमावाची समजूत काढून रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी खुली केली आहे.
