Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

PCMC : भाजपने केला अजित पवार गटाचा प्रचार न करण्याचा ठराव

पिंपरी:  लोकसभा निवडणूक प्रचार मोहिमेदरम्यान न राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या, कार्यकर्त्यांनी महायुतीचा प्रचार न केल्याचा आरोप करून भाजपा आमदार उमा खापरे आणि अमित गोरखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रचार न करण्याचा ठराव केला आहे. या नेत्यांचा प्रामुख्याने अण्णा बनसोडे यांना स्थानिक पातळीवर विरोध आहे. 

महायुती मधील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून एकत्रित निवडणूक लढवण्यासाठी स्थानिक नेत्यांमध्ये समन्वय साधणे आव्हानात्मक ठरणार आहे. वरिष्ठ पातळीवर योग्य प्रकारे संवाद असला तरीही स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये खडाजंगी होत असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घटक पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्याचे मोठे आव्हान महायुतीच्या नेत्यांना पेलावे लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत कमळाचे चिन्ह असलेल्या उमेदवार मिळाला नाही. त्यावेळी घड्याळाचा प्रचार करावा लागला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी भाजपचा प्रचार केला नाही. अजित पवार गटाने महायुतीचा धर्म पाळला मग आता आपण घड्याळाचा प्रचार का करायचा, असा त्यांचा सवाल आहे. त्यामुळे आता कमळाच्या चिन्हावरच उमेदवार असावा अशी पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांची मागणी असून जागावाटपापूर्वी ही भावना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य नेत्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असे खापरे आणि गोरखे यांनी सांगितले. सदाशिव खाडे आणि भाजपचे प्रवक्ते राजू दुर्गे यांनीही दोन्ही आमदारांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading