Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

राशी खन्ना आणि विक्रांत मॅसी स्टारर ‘द साबरमती रिपोर्ट’ या तारखेला होणार रिलीज

 संपूर्ण भारतातील युवा स्टार राशी खन्ना आणि विक्रांत मॅसी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘द साबरमती रिपोर्ट’ ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून यात राशी एका रिपोर्टरची भूमिका करताना दिसणार आहे जो साबरमती एक्स्प्रेस घटनेमागील सत्य उघड करण्याच्या मोहिमेवर आधारित चित्रपट असणार आहे.
निर्मात्यांनी चित्रपटाच्या तीव्रतेची झलक देऊन एका प्रभावी पोस्टरसह रिलीजची तारीख जाहीर केली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवीन पोस्टर शेअर करून त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हे नवं पोस्टर पोस्ट केलं आहे ” ज्वलंत सत्य 15 नोव्हेंबरला समोर येईल! सोबत रहा! #TheSabarmatiReport फक्त सिनेमागृहात!”
रंजन चंदेल दिग्दर्शित हे गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ २७ फेब्रुवारी २००२ रोजी सकाळी साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या घटनेचे तपशीलवार आधारित असून याआधी रिलीज झालेल्या ट्रेलरने राशी आणि विक्रांत भूमिका कशी प्रभावी असणार आहे याची एक झलक दिली होती.
 ‘द साबरमती रिपोर्ट’ च्या रिलीजच्या पलीकडे राशी खन्ना पुढील चित्रपट ‘तलाखों में एक’ मध्ये पुन्हा विक्रांत मॅसीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करण्याची तयारी करत आहे जो लवकरच रिलीज होणार आहे. तिच्याकडे ‘तेलुसू काडा’ नावाचा तेलगू चित्रपट देखील आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading