सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन…!
पूर्णा : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी दक्षिण माजी पदाधिकाऱ्यांच्या वतीने व पूर्णा तालुका भारतीय बौद्ध महासभा माजी पदाधिकारी समता सैनिक दल माता रमाई महिला मंडळ त्यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल डॉक्टर आंबेडकर नगर या ठिकाणी अभिवादन सभेचे आयोजन भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
या सभागृहामध्ये वर्षावासानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन सुरू आहे. गेली 21 वर्षापासून. बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक तुकाराम ढगे गेली 21 वर्षापासून ग्रंथ वाच न सातत्याने या ठिकाणीकरत असतात. भारतीय बौद्ध महासभा व माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावासामध्ये ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम सुरू असतो.
ग्रंथ वाचन संपल्यानंतर अभिवादन सभेला सुरुवात करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा शाखेचे माजी कोषाध्यक्ष गौतम वाघमारे सर माजी जिल्हा सरचिटणीस बौद्धाचार्य तुकाराम जी ढगे सर भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हा हिशोब तपासणीस श्रीकांत हिवाळे सर
यांनी सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर यथोचित प्रकाश टाकला.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्याने कश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत बुद्ध धम्म प्रचार आणि प्रसारच कार्य यशवंत उर्फ सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी केले.
अभिवादन सभेला भारतीय बौद्ध महासभेचे माजी पदाधिकारी ज्ञानोबा जोंधळे मुंजाजी गायकवाड श्रावण येंगडे डॉक्टर तुपसमंदर बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे किशोर ढाकरगे धम्मा खंदारे बौद्धाचार्य उमेश बारहाटे अंबादास साबळे अतुल गवळी समता सैनिक दलाचे कमांडर विश्वनाथ कांबळे राहुल कचरे राजू गायकवाड केशव मकासरे गौतम गायकवाड माजी नगरसेवक नटराज कांबळे माजी जिल्हा संघटक लक्ष्मण गायकवाड बोरगावकर व सर्व समता सैनिक दल सैनिक माता रमाई महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी आदींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
सरनाताई गाथेने अभिवादन सभेचा समारोप झाला.
