Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRA

खा. संजय दिना पाटील यांच्या प्रयत्नांमुळे गणेश विसर्जन सुरळीतकृत्रिम तलावामुळे गर्दीचे प्रमाण घटले.

 

मुंबई  – लाडक्या बाप्पाला काल मोठ्या भक्ती भावाने निरोप देण्यात आला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन मुंबईसह राज्यात कडक पोलीस बंन्दोबस्त ठेवण्यात आला होता. ईशान्य मुंबईत मुलुंड, भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर तसेच शिवाजी नगर व मानखुर्द या ठिकाणी शिवसेनेच्यावतिने मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तलाव बांधण्यात आले होते. त्यामुळे गणेश भक्तांना गर्दीचा त्रास न होता सहजपणे गणेश विसर्जन करता आले.

ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी पालिका तसेच पोलीस अधिका-याशी चर्चा केल्यावर कृत्रिम तलावाची गरज असल्याचे त्यांच्या निर्दशनास आणुन दिले. त्यानुसार ईशान्य मुंबईत गरज त्या ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे सहजपणे गणेश भक्तांना गणेश मुर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करता आले. त्यामुळे अनेक भागात गर्दीचे प्रमाण कमी झाल्याने विसर्जन करताना कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. खासदार संजय दिना पाटील यांच्या घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळातील गणपतीचे विसर्जन पवई या ठिकाणी करण्यात आले. विसर्जना ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंन्दोबस्त ठेवण्यात आला होता. मुलुंड येथील मोरर्या तलाव, भांडुप गांव, कांजुर गांव तसेच अनेक विसर्जन ठिकाणी पालिका अधिका-यांनी सर्व सुख सुविधा गणेश भक्तांना दिल्या होत्या. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत विसर्जन सोहळा पार पडला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading