Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNE

३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये लावणीचा जल्लोष

‘सोडा सोडा राया हा नाद खुळा’, ‘पाटलांचा बैलगाडा’, ‘बाई वाड्यावर या’, ‘हिऱ्याची अंगठी’, ‘चंद्रा’, ‘बाई ग’, ‘पैलवान आला रे’, ‘कैरी पाडाची’, ‘बाई पिचली माझी बांगडी’, ‘मुळीच नवतरे माझा मना’ अशा बहारदार लावण्यांनी ३६व्या पुणे फेस्टिव्हलच्या अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे सोमवारी, १६ सप्टेंबर रोजी झालेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या सदाबहार लावणीच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांना ठेका धरायला लावला. शशिकांत कोठावळे यांच्या संयोजनात नृत्यांगना अर्चना जावळेकर, संगीता लाखे, किरण पुणेकर, प्राची मुंबईकर, नमिता पाटील व सहकलावंतांनी लावणीच्या ठेक्यावर आपल्या अप्रतिम नृत्यकलेने रंगमंचावर आगळीच उर्जा निर्माण केली. रंगमंदिर  प्रेक्षकांनी खचाखच भरलेले होते.

सोमनाथ फड यांच्या निवेदनाने, तर संगीत संयोजनात ढोलकीवर स्वप्निल गायकवाड व लकी कांबळे, ऑक्टोपॅडवर सुशांत मस्के आणि कीबोर्डवर अक्षय सकट यांचा ठसा उमटला. गायिका स्वाती शिंदे यांच्या आवाजाने लावण्यांना वेगळेच रंग दिले. पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, बालगंधर्व रंगमंदिर कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू यांच्या हस्ते कलाकारांचे सत्कार करण्यात आले. अतुल गोंजारी व श्रीकांत कांबळे येवेली उपस्थित होते.

३६व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे महाराष्ट्र पर्यटन विभागाचे पर्यटन संचालनालय आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून, पंचशील, सुमा शिल्प लि.,भारत फोर्ज आणि नॅशनल एग्ज को–ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, बढेकर ग्रुप,अहुरा बिल्डर्स आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading