सुरक्षित रस्त्यांची उभारणी: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे बारामती येथे प्रभावी रस्ते सुरक्षा कॅम्पेनचे आयोजन
बारामती : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे (एचएमएसआय) प्रभावी जागरूकता कॅम्पेनचे आयोजन केले जाते. अशाप्रकारच्या कॅम्पेनचे आयोजन नुकतेच बारामती येथे करण्यात आले होते. यावेळ एचएमएसआयने डी. ए. सातव हायस्कूल आणि श्री छत्रपती शाहू हायस्कूलचे २५०० विद्यार्थी आणि स्टाफमधील सदस्यांना रस्त्यावरील सुरक्षेचे महत्त्व समजावून दिले.
भविष्याला आकार देण्यात लहान मुलांची भूमिका मोठी असेल हे लक्षात घेऊनच एचएमएसआय मुले व तरुणांमध्ये रस्त्यावर वावरण्याच्या सुरक्षित सवयी रूजवत आहे. संवादी आणि आकर्षक उपक्रमांच्या मदतीने कंपनीने रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी करण्याचे ठरवले असून त्याचबरोबर रस्त्याचा जबाबदारीने वापर करण्याची वृत्ती रूजवण्याचे ध्येय ठेवले आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या कॅम्पेनचे शाळा, कॉलेज आणि सरकारी संस्थांमध्ये आयोजन केले जाते.
बारामती येथे घेण्यात आलेल्या रस्ते सुरक्षा जागरूकता कॅम्पेनमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले व हे उपक्रम उपस्थितांचे रस्त्यावरील सुरक्षेबद्दलचे ज्ञान उंचावण्याच्या हेतूने खास तयार करण्यात आले आहेत. सेफ्टी रायडिंग थिअरी सेशन्स, धोक्याचा अंदाज लावणारे प्रशिक्षण, रोड सेफ्टी प्रश्नमंजुषा, हेल्मेटबाबत जागरूकता आणि रायडिंग ट्रेनर सेशन अशा संवादी सत्रांचे उपस्थितांना शिक्षित केले. प्रत्येक उपक्रमात रस्त्यावरील सुरक्षेविषयीचे शिक्षण माहितीपर तसेच मनोरंजक होईल आणि त्यातून शिकलेला धडा दीर्घकाळ टिकेल याची काळजी घेण्यात आली.
एचएमएसआय एचएमएसआयने डी. ए. सातव हायस्कूल आणि श्री छत्रपती शाहू हायस्कूलने हा महत्त्वाचा उपक्रम आयोजित करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहे. एकत्रितपणे आपण रस्त्यावर अधिक सुरक्षित वातावरण तयार करू शकू आणि अपघात व दुखापतींचे प्रमाण कमी करू.
स्थापनेपासून एचएमएसआयने महाराष्ट्रातील ३ लाख प्रौढ आणि मुलांना रस्त्याचा जबाबदारीने वापर कसा करावा तसेच सुरक्षितपणे वाहन कसे चालवावे याचे शिक्षण दिले आहे.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाची रस्ते सुरक्षाप्रती सीएसआर बांधिलकी
२०२१ मध्ये जाहीर करण्यात आल्याप्रमाणे ‘होंडाने २०५० पर्यंत जागतिक पातळीवर होंडा मोटरसायकल्स आणि वाहनांचा समावेश असलेले अपघात शून्यावर आणण्याचे ध्येय ठेवले आहे. भारतात एचएमएसआय या ध्येयाच्या दिशेने सरकारच्या मदतीने काम करत असून हे ध्येय साध्य करण्यासाठीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे, २०३० पर्यंत मृत्यूचे प्रमाण निम्म्यावर आणायचे ध्येय आहे.
हे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या मुलांमध्ये रस्त्यावरील सुरक्षेविषयी सकारात्मक मानसिकता रूजवणे आणि त्यानंतरही त्यांना शिक्षण देत राहाणे आवश्यक आहे. शाळा आणि कॉलेजमध्ये रस्त्यावरील सुरक्षेविषयी दिले जाणारे शिक्षण जागरूकता निर्माण करते व त्याचबरोबर मुलांमध्ये सुरक्षा संस्कृती रूजवत त्यांना सुरक्षा दूत बनवण्याचे काम करत आहे. यामुळे पुढच्या पिढया जास्त जबाबदार होण्यास मदत होईल व ते अधिक सुरक्षित समाजासाठी लक्षणीय योगदान देतील.
समाजाला हवीशी वाटणारी कंपनी बनण्याचे एचएमएसआयचे ध्येय आहे आणि समाजातील सर्व थरांमध्ये रस्त्यावरील सुरक्षेविषयी जागरूकता पसरवण्यासाठी कंपनी नेटाने झटत आहे. शालेय मुलांपासून कॉर्पोरेट्सपर्यंत समाजातील प्रत्येक वर्गासाठी कंपनीने नाविन्यपूर्ण उपक्रम तयार केले आहेत.
एचएमएसआयच्या कुशल सेफ्टी इन्स्ट्रक्टर्सची टीम भारतभरात आमचे १० दत्तक ट्रॅफिक ट्रेनिंग पार्क्स (टीटीपी) आणि ६ सेफ्टी ड्रायव्हिंग एज्युकेशन सेंटर्समध्ये (एसडीईसी) रोज हे उपक्रम राबवत समाजातील प्रत्येक विभागासाठी रस्ते सुरक्षा शिक्षण सहजपणे उपलब्ध करून दिले जाता. आतापर्यंत ७.७ दशलक्ष भारतीयांपर्यंत हे उपक्रम पोहोचले आहेत. एचएमएसआयच्या नॅशनल सेफ्टी अवेयरनेस प्रोग्रॅमने हे शिक्षण मजेदार तरीही शैक्षणिक केले आहे.
वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेले लर्निंग मोड्युल – होंडाच्या कुशल मार्गदर्शकांनी रस्त्यावरील चिन्हे आणि खुणा, रस्त्यावरील चालकाचे कर्तव्य, रायडिंग गियर आणि स्थिती आणि सुरक्षितपणे गाडी चालवण्याचे तंत्र यांवर थिअरी सत्र तयार केले आहे.
१. प्रत्यक्ष शिक्षण: होंडाच्या व्हर्च्युअल रायडिंग स्टिम्युलेटरवर खास प्रशिक्षण देत सहभागींना प्रत्यक्ष गाडी चालवण्यापूर्वी रस्त्यावरच्या संभाव्य १०० धोक्यांचा अनुभव देण्यात आला.
२. संवादी सत्र: सहभागींना किकेन योसोकु ट्रेनिंग (केवायटी) हे धोक्याचा अंदाज लावण्याचे तंत्र शिकवण्यात आले, ज्यामुळे धोक्याविषयी रायडर/चालकाची धोका ओळखण्याची क्षमता तीव्र होते व रस्त्यावरील वाहन चालवताना सुरक्षेला प्राधान्य दिले जाते.
३. सद्य चालकांसाठी रायडिंग कौशल्य विकास – आधीपासून वाहन चालवत असलेले विद्यार्थी आणि शालेय कर्मचारी यांना स्लो रायडिंग उपक्रम व अरूंद फळ्यांवर वाहन चालवत प्रशिक्षण देण्यात आले.
